भाजपाच्यावतीने दिपावली स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन.. खासदार तडस, आ.कुणावार, आ.आंबटकर यांची उपस्थिती

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225)

        

दिवाळी हा अत्यंत आनंददायी सण असून गरीब श्रीमंत परिवारातील लहानथोर व्यक्ति या सणाची आतुरतेने वाट बघतो,परंतु कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या २ वर्षापासून या आनंदावर विरजन पडले होते,परंतु आता कोरोनाचा धोका कमी झाल्याने भाजपा कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांचेवतीने शहरातील निखाडे मंगल कार्यालयात काल दि.२३ रोजी दिपावली स्नेहमिलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
उपरोक्त स्नेहमिलन कार्यक्रम खासदार रामदास तडस,हिंगणघाट -समुद्रपुर-सिन्दी रेल्वे विधानसभा क्षेत्राचे आमदार समीरभाऊ कुणावार, विधानपरिषद सदस्य आ.रामदास आंबटकर,भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, भाजपा प्रदेश सचिव राजेशजी बकाने, महामंत्री किशोर दिघे,महामंत्री अविनाश देव,युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस अंकुश ठाकूर, जिल्हा परिषदेच्या सभापती मृणालताई माटे , जि प सभापती माधवराव चंदनखेडे, इत्यादि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. आमदार समिर कुणावार यांनी या स्नेहमिलन कार्यक्रमाची पार्श्वभूमि विषद करतांना विधानसभा क्षेत्रातील कोरोना महामारीने मृत पावलेल्या दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी विधानसभा क्षेत्रातील सर्व भाजपा पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सभापती, पंचायत समिती उपसभापती, पंचायत समिती सदस्य, हिंगणघाट समुद्रपूर सिंदि(रेल्वे) येथील नगर परिषद व नगर पंचायत नगरसेवक, नगरसेविका तसेच भाजपा कार्यकर्ते शेकडोच्या संखेने कार्यक्रमाला उपस्थित होते.
स्नेहमिलन कार्यक्रमाचे दरम्यान संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले,कायक्रमाचे समारोपानंतर सर्व उपस्थितांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी भाजपाचे हिंगणघाट तालुकाध्यक्ष आकाश पोहाणे,समुद्रपुर तालुकाध्यक्ष संजय डेहणे,शहर अध्यक्ष आशिष पर्बत इत्यादिंनी परिश्रम घेतले.