
दिनांक 6 डिसेंम्बर 1956 रोजी जनतेचे कैवारी ,. संविधानाचे जनक, विश्वरत्न, प. पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. सर्व ठिकाणी शोकांतिका पोहचली .
आज डॉ .बाबा साहेब आंबेडकर यांना जाऊन 65 वर्ष झाले तरी सर्व जनतेच्या मनात त्यांच्या प्रति भावना आहे. त्यांनी लिहलेले संविधान आज पर्यंत व आजतागायत लागू राहील अश्या महामानवाला आज दिनांक 6 डिसेंम्बर 2021 रोजी आम आदमी पार्टी चंद्रपूर जिल्हा आणि महानगर टीम ने अभिवादन करत महामानवाला आठवण करत त्यांचे आचार विचार स्वतः मध्ये अंगीकृत करून जनतेची सेवा करणार असे ठाणले आहे . या वेळी आप चंद्रपुर जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे , जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी, युवा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, सोशल मीडिया हेड राजेश चेडगुलवार , महानगर उपाध्यक्ष सिकंदर सागोरे, कालिदास ओरके, शेषराव कायरकर, सुजित चेडगुलवार, दिलीप तेलंग, बबन कृष्णापल्लीवार, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते .
