वंदनीय राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज यांचा 53 वा आणि वैराग्यमूर्ती श्री संत गाडगे महाराज यांचा 65 वा पुण्यतिथी महोत्सव साजरा

राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

जय गुरुदेव सेवा मंडळ आणि समस्त गावकरी चिखली वनोजा यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात श्री गुरुदेव सेवा मंडळ चिखली व सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत “घटस्थापना” करून करण्यात आली दररोज ग्रामस्वच्छता करून सकाळी सामुदायिक ध्यान ,संध्याकाळी सामुदायिक प्रार्थना व भजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला सामुदायिक प्रार्थना या विषयी राळेगाव तालुका सेवा अधिकारी श्री रुपेश भाऊ रेंगे (ग्रामगीताचार्य )यांचे प्रबोधन व मार्गदर्शन लाभले श्री.गणेश दादा फटींग ( माजी राळेगाव तालुका सेवा अधिकारी) तसेच गुरुदेव सेवा मंडळ चिखली ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्री गुरुदेव सेवा मंडळ डौलापूर यांचा भजनाचा कार्यक्रम व दुसरे दिवशी ह-भ-प सुरकर महाराज ( सांवगी) यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारावर कीर्तन व प्रबोधन करून काल्याचा कार्यक्रम पार पाडला नंतर वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या पालखी व भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले त्या निमित्ताने संपूर्ण गावकऱ्यांनी कोणतेही मतभेद न ठेवता संपूर्ण गाव स्वच्छ करून प्रत्येकाने घरासमोर रंगीत रांगोळी काढून आपल्या आराध्य दैवताची प्रतिमा ठेवून सुशोभन केले होते आणि काही गावकरी यांनी ठिक ठीकाणी दिंडीतील व इतर भक्त मंडळींना नाश्ता व चहा पाण्याची व्यवस्था केली होती गावातील लहान लहान मुलींनी या दिंडी सोहळ्यात मराठमोळी वेश परिधान करून गावकऱ्यांचे आणि भक्तगणांची लक्ष वेधून घेतले होते या दिंडी सोहळ्यात पंचक्रोशीतील काही भजनी मंडळी यांनी सहभाग घेतला होता यात1) जय दुर्गा महिला भजनी मंडळ चिखली 2)श्री संत गाडगे महाराज महिला भजनी मंडळ रामतीर्थ 3) सती सोनामाता भजनी मंडळ कोपरी 4)माऊली महिला भजनी मंडळ शेळी (माड) 5) गायत्री महिला भजनी मंडळ चिखली 6) जय बजरंग महिला भजन मंडळ वनोजा 7)शारदा माता महिला भजनी मंडळ सराई 8) आनंदी माता महिला भजनी मंडळ रामतीर्थ 9) शारदा माता महिला भजनी मंडळ चिखली 10)मुक्ताबाई महिला भजन मंडळ शेळी(माड) 11)ओम शिवशक्ती भजनी मंडळ वनोजा 12)निवृत्ती भजनी मंडळ वनोजा या भजनी मंडळांनी देहभान विसरून भक्तिभावाने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भजने आणि गोंडी भजन म्हणून गावातील लोकांची मने जिंकली व संतांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करून एकीचे दर्शन घडविले यामुळे चिखली नगरीला एक दिवाळी सणाचे स्वरुप आले होते असे गावकर्‍यांचे म्हणणे होते सर्वच दिंड्या रमत गमत मंडपात येऊन पोहोचल्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बाबा भाऊ रहाटे, प्रमुख पाहुणे रुपेश भाऊ रेंगे ,श्री गणेश भाऊ फटिंग दादा, मनोज उमाटे ,रामभाऊजी बरडे, भाऊरावजी राहटे व सौ कांचन ताई घायवटे (पोलीस पाटील )आणि संपूर्ण गावकरी गुरुदेव भक्त यांचे उपस्थित प्रत्येक दिंडीला ग्रामगीता ग्रंथ, श्री गुरुदेव दिनदर्शिका व नारळ पान मानधन देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गावांमधून इयत्ता 12 वी मध्ये प्रथम क्रमांक कुमारी जानवी हुलके व इयत्ता 10 वी मध्ये प्रथम क्रमांक पियुष पडोळे यांचा ग्रामगीता ग्रंथ व श्री गुरुदेव दिनदर्शिका आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला नंतर राष्ट्रवंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सर्वांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री गुरुदेव सेवा मंडळ चिखली ,नवयुवक बालवृद्ध आणि समस्त चिखली ग्रामस्थांनी तन- मन -धना ने सहकार्य करून कार्यक्रम पार पाडला