
26 डिसेंबर श्रद्धेय बाबा आमटे यांच्या जयंती निमित्ताने आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा, आनंदवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
श्रद्धेय बाबा आमटे यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुरुवार दिनांक 30 डिसेंबर 2021 रोजी आनंद निकेतन महाविद्यालयातील वुमन हेल्थ ऍण्ड कौन्सिलिंग सेल,राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना आणि साईनाथ ब्लड सेंटर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आनंद निकेतन महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मृणाल काळे, साईनाथ ब्लड सेंटरचे डॉक्टर व सहकारी, तसेच वुमन हेल्थ ऍण्ड कौन्सिलिंग सेल व राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ.रंजना लाड,सहकार्यक्रम अधिकारी डॉ.नरेंद्र पाटील,राष्ट्रीय छात्र सेनेच्या लेफ्टनंट लता आत्राम,यांची उपस्थिती या शिबिराला होती. रोटरी क्लब ऑफ वरोरा चे विशेष सहकार्य या रक्तदान शिबिराला लाभले.विशेष म्हणजे या शिबिराला सहकार्य करणारे रोटरी क्लब चे पदाधिकारी हे आनंदनिकेतन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांच्यावतीने रक्तदात्यांसाठी अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती.याशिवाय वरोरा गावातील स्थानिक व महाविद्यालयातील विद्यार्थी यांचाही उस्फुर्त प्रतिसाद या रक्तदान शिबीराला मिळाला. जवळपास 101 लोकांनी रक्तदान केले. सर्व रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना सर्टिफिकेट व भेटवस्तू देण्यात आली.शिबीर यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीने व राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
