
वणी :- कुंड्रा येथील स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयात राष्ट्रामाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती आज ता.१२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांना व छत्रपती संभाजी महाराजांना घडविणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची मोठ्या उत्साहात सर्वत्र जयंती साजरी केल्या जात असून युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची देखील जयंती संयुक्तरित्या साजरी करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून कुंड्रा ग्राम पंचायतीचे सरपंच विजय ठावरी तसेच शुभम गोरे व स्वामी विवेकानंद सार्वजनीक वाचनालय कुंड्रा चे अध्यक्ष मंगेश गोरे उपस्थित होते. यावेळी सर्वांनी आई जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला हारपर्ण करून त्यांना अभिवादन केले यावेळी गणेश बुच्चे , गणेश येडे, विकास गोरे , सुप्रित डोहे आदि उपस्थीत होते.
