
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225)
शेतकऱ्यांना यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना,व नंतर आलेली महात्मा फुले कर्जमाफी योजना होती.या दोनही योजनेतून काही शेतकरी वंचित राहीलेले आहे.तांत्रीक कारणांमुळे, योजनेतील अटींमुळे,शेतकर्याच्या अनास्थेमुळे , आणि नंतरच्या काळातील सततच्या नापीकीमुळे काही शेतकरी आजही कर्जमुक्त व्हायचे आहे.अशा शेतकऱ्यांना बॅंक वन टाईम सेटलमेंट योजना अंतर्गत मुद्दल अधीक व्याज च्या ऐकुण रकमेवर २५%सवलत देते.या योजनेची प्रसीध्दी पुरेशा प्रमाणात व्हावी म्हणून शेतकरी हीतासाठी बेंबळा कालवे शेतकरी संघर्ष समिती प्रयत्न करीत असुन,वन टाईम सेटलमेंट योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन बेंबळा कालवे शेतकरी संघर्ष समितीचे सुधीरभाऊ जवादे, डॉ अशोकराव फुटांणे,बाबाराव महाजन, अमोलराव भोयर,गजुजी लेनगुरे, विनोदराव कावडे यांनी केले आहे.
