वंचितच्या निराधार शिबिराचे श्रेय लाटण्यासाठी भाजपचा केविलवाणा प्रयत्न निराधार शिबिरांमुळे भाजपला सतावली हवा गुल होण्याची भीती

  • Post author:
  • Post category:वणी

वणी :- वंचित बहुजन आघाडी व श्रीगुरुदेव सेनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या एक दिवस निराधारासाठी या उपक्रमात आज ता. २७ रोजी दुपारी १२ वाजता येणक येथे ग्राम पंचायतच्या माध्यमातून आयोजन केले होते. परंतु या शिबिराचे सर्व श्रेय घेण्यासाठी भाजपाच्या नेत्यांचे बॅनर बनवून लावले गेले व याच बॅनरखाली शिबिर घ्या अन्यथा घेऊ नका असा आग्रह भाजपच्या एका माजी पदाधिकाऱ्यानी हट्ट धरला व शेवटी गोर गरिबांकडे न बघता चक्क शिबिर रद्द करून शिबिर घेणाऱ्यांना अपमानाची वागणूक देऊन माघारी पाठविल्याने येणक गावात भाजपा विषयी प्रचंड रोष निर्माण होताना दिसून येत होता.
श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांनी मागील तीन महिन्यापासून एक दिवस निराधारासाठी असा स्तुत्य उपक्रम सूरु केला आहे. या उपक्रमाअंतर्गत आज पर्यंत जवळ पास २० पेक्ष्या जास्त गावात शिबिर राबविण्यात आले आहे. यात शेकडो गोर गरीब , वयोवृद्ध, विधवा, दिव्यांग व दुर्धर आजाराच्या लोकांना निराधार योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळे या शिबिराला गावागावातील लोकांचा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भाजपच्या लोकांमध्ये पोटात दुखणे भरले आहे. सदर शिबिर हे येणक येथील ग्रामपंचायत सरपंच्या कल्पनाताई टोंगे यांनी दिलीप भोयर यांचेशी संपर्क करून आयोजन केले होते. व याबाबत वॉट्सअँप वर माहिती देखील सौ. टोंगे यांना देण्यात आली होती. शिबिराचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्य निराधार सेवा सप्ताह च्या अनुषंगाने केले होते. निराधार गोर गरीब लोकांचा वाढता प्रतिसाद बघून आज भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी माजी केंद्रीय मंत्री, आमदार, माजी जि.प. सदस्य , पंचायत समितीचे माजी उपसभापती व सरपंच्या यांचे फोटो लावून निराधार मार्गदर्शन शिबिर ग्रा. पं. येणक असे बॅनर लावले होते. यावरून असे स्पष्ठ निदर्शनास येत होते की जणू हे शिबिर भारतीय जनता पार्टीच्या लोकांनीच आयोजित केले असावा पण असे वास्तव नसून सदर उपक्रम हा वंचित बहुजन आघाडी व श्री गुरुदेव सेनेच्या माध्यमातून राबविल्या जात आहे. परंतु यातही भाजपच्या लोकांनी राजकारण शिरवून या उपक्रमाला खंडित केले आहे. त्यामुळे निराधार गोर गरिबांच्या ताटात माती कालविल्याच्या प्रकार भाजप वाल्यानी केल्याचे आरोप संपूर्ण गावात केल्या जात आहे. या प्रकारामुळे भाजपच्या प्रती गावकाऱ्यांमध्ये प्रचंड रोष व्यक्त केल्या जात आहे.

निराधारांचा हिरमोड होणे हे मोठे दुःखच – दिलीप भोयर


आयोजित शिबिरात केवळ राजकीय हस्तक्षेप झाल्याने आज प्रथमच येणक येथे निराधारांचा हिरमोड झाला आहे. हे माझ्यासाठी खूप मोठी दुःखाची बाब आहे. निराधार सेवा ही जनतेची सेवा आहे. अश्या लोकाभिमुख कार्यात असे राजकारण व्हायला नव्हते पाहिजे असे मत श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांना संपर्क केल्या असता त्यांनी बोलून दाखवले.