
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव विधानसभा मतदारसंघातील आदिवासींचे नेते तथा माजी पंचायत समिती उपसभापती सुरेश मेश्राम यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून घरवापसी केली आहे नुकतेच मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात हा प्रवेश सोहळा संपन्न झाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे उपस्थितीत सुरेश मेश्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला या कार्यक्रमाला अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे ,सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे प्रदेश सरचिटणीस गजरे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस आदिवासी सेलचे प्रदेशाध्यक्ष राजू तोडसाम माजी आमदार संदीप बाजोरिया जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर युवक प्रदेश उपाध्यक्ष रूपेश राठोड आशिष मानकर या मान्यवरांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाला सुरेश मेश्राम यांच्या पक्षप्रवेशाने विधानसभा मतदारसंघातील पक्षवाढीसाठी मदत होणार असून मतदारसंघात पक्ष आणखी बळकट होणार एवढे निश्चित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मेश्राम यांनी मतदारसंघात जनसामान्यांच्या कामाला प्राथमिकता देण्याबरोबरच पक्ष बळकटीसाठी ही प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
