
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील कळमनेर वालधूर व दापोरी ग्राम विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी मानकर गटाचे सतीशराव वैरागडे तर उपाध्यक्ष पदी किशोरराव यादव यांची निवड करण्यात आली.सदर कळमनेर ग्राम विकास सहकार सोसायटीच्या निवडणुकीत मानकर गटाचे श्री सुधाकरराव डाखोरे व काशीनाथजी ठाकरे कळमनेर येथिल यांच्या पुढाकाराने 13 पैकी 13 जागेवर हि विजय मिळवला आहे. तर मानकर गटाचे विजयी उमेदवार सतीश वैरागडे अध्यक्ष तर उपाध्यक्ष किशोर यादव तर सदस्य प्रदीप मानकर, बंटी ठाकरे, सुधाकर नान्हे, संदीप जीडेवर तर सौ.कविता विटनकर,सौ.विद्याताई मानकर ,श्रीमतीनंदाबाई लोहटे ,श्रीमती मंदाबाई धोटे ,आत्माराम गोटे, चिंदुजी परचाके ,प्रल्हादराव मानकर हे निवडणुकीत विजयी झाले आहेत .सदर वरील सर्व उमेदवारांना सहकार क्षेत्राचे नेते तथा यवतमाळ जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्लभाऊ मानकर व राजुभाऊ तेलंगे ,शामभाऊ येनोरकर, राजू भाऊ महाजन यांनी पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. व अनेक दिवसांपासून अनपोज निवडणूक होत होती व तेली समाजाला अजुन पर्यंत सोसायटीचे अध्यक्ष पद मिळाले नव्हते त्यामुळे सतीश वैरागडे यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या राळेगाव तालुक्यात चांगला संदेश गेलेला आहे
