ब्लिचिंग पावडर फक्त बिलावर नागरिकांच्या हातात राकोंडा ?मौजे सारखणी येथील फिल्टर प्लांट जाणीव पूर्वक बंद?

संग्रहित फोटो

ग्राम पंचायत सारखणी कडून नागरिकांच्या आरोग्याची खेळी नागरिकांना
लहान मुलांन सोबत मोठ्यांना देखील उलट्या पोट दुःखी जुलाब सारखे आजार.मौजे सारखणी येथील ग्राम पंचायत कार्यालय येथील वॉटर फिल्टर प्लांट हा काही वर्षा पासून बंद आहे वॉटर फिल्टर प्लांट सुरू करन्यात यावा या साठी नागरिकांन कडून वर्ष भरा पासून मागणी होत होती पण वॉटर फिल्टर प्लांट सुरू करण्यात ग्राम पंचायत ला रस नसल्याचे दिसून आले आहे.

अखेर जुलै महिन्याच्या सुरुवातीला निदान ब्लिचिंग पावडर तरी मिळेल या अपेक्षेत नागरिकांना जून महिन्याच्या अर्ध्या त सुद्धा ब्लिचिंग पावडर दिले नसल्याने लहान चिमुकल्या मुलान सोबत तरुणाईला सुद्धा दवाखाना गाठण्याची वेळ आली असल्याने मौजे सारखणी येथील नागरिकानी आरोग्या बद्दल चिंता व्यक्त करत ग्राम पंचायत सारखणी यांच्या विषयी काही प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले की पद अधिकाऱ्यांना आणि लोक प्रतिनिधींना ज्या कामात आर्थिक लाभ मिळते ते त्याच कामास प्राधान्य देतात
नागरिकांच्या आरोग्याशी यांना काही घेणं देणं नसल्याचे सुद्धा नागरिकांनी सांगितले आहे