
ढाणकी – प्रतिनिधी प्रविण जोशी
.
ढाणकीः मेन रोड भारतीय स्टेट बॅंक जवळ नागरीकांनी रस्त्यांच्या बाजूला दुचाकी तरलावल्यामुळे रस्ता रूंद झाला त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरीकांसह वाहन चालकांची कोंडी झाली.जुन्या बसस्थानकापासून ढाणकी मुख्य बाजार पेठेकडे जाणाऱ्या या रस्त्यावर नागरीकांची नेहमी वर्दळ असते.शहरातील पुसद अर्बन बॅंक,यवतमाळ अर्बन बॅंक,बुलढाणा बॅक,मुलींची शाळा ळा,ग्राहक सेवा केंद्र,कापड दुकाण लाईन,प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खाजगी दवाखाण्यात नागरीकांची मोठी रेलचेल असते.ग्रामीण भागातून आलेले नागरीक आपली वाहणे रस्त्यावर अशी उभी करून तास तास आपल्या खाजगी कामात व्यस्थ असतात.वाहणासाठी पार्कींगची व्यवस्था कुठेही नसल्यामुळे भर रस्त्यात वाहण्े उभी करतात.त्यामुळे सामन्य नागरीकांना या रस्त्यावर चालतांना मोठी कसरत करावी लागते.
अनेक वेळा मोठी वाहणे सुध्दा अडकतात त्या वेळेत फार मोठी समस्या निर्माण होवून वाहनांची कोंडी होते.पोलीस विभागाकडून येथे पोलीस कर्मचारी पाहरेदारीवर ठेवला तर वाहण चालकांना रस्त्यावर वाहणे उभी करण्यास मनाई होईल.शिवाय दुकाणदारांना सुध्दा समज देवून शिस्त लावता येईल.नगरपंचायतने कडक पावले उचलून वाहणधारकावर कारवाई केली तर कोणत्याही प्रकारचा वाहनांची वाहतूक कोंडी होणार नाही
