
ढाणकी प्रतिनिधी:( प्रवीण जोशी)
ढाणकीच्या विकास कार्यावरून नगरपंचायतीला धारेवर धरून ढानकीतील रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न नागरिकांनी सोशल मीडिया वरून उपस्थित केला नुकत्याच दोन कोटी रुपयांच्या डांबरीकरणावरही पाण्याची डबके साचु लागली त्यावरही खडी टाकण्याची मागणी करण्यात आली .अकार्यक्षम नगरपंचायत च्या मनमानी कारभार व जागोजागी रस्त्यावर साचत असलेले पावसाचे पाणी व त्यामुळे होणारा चिखल या विरोधात आज शिवसेना युवासेना ढाणकी शहर तर्फे निवेदन देण्यात आले आहे यावेळी शिवसेना विधानसभा स ह संघटक प्रशांत जोशी, तालुकाप्रमुख संजय कुंभरवार, शिवसेना शेतकरी शेतमजूर आघाडी तालुकाप्रमुख गणेशराव नरवाडे, शिवसेना अल्पसंख्याक आघाडी तालुकाप्रमुख,शहरप्रमुख बंटी जाधव, युवासेना तालुकाप्रमुख संभाजी गोरटकर, युवासेना उपतालुकाप्रमुख विशाल नरवाडे,अल्पसंख्याक शहरप्रमुख फिरोज भाई, युवासेना शहरप्रमुख विजय वैद्य,शैलेश करकले युवासेना शहर संघटक,अभय सोनुने,अतुल पराते, दिनेश लिंगमपल्ले,शामभाऊ शिराळे, यादवराव दर्शनवाड उपस्थित होते.
