
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे कार्यात असलेले ड्रॉ. व कर्मचारी हे आपली सेवा देत असताना त्यांना रक्षाबंधन उत्सव आपल्या गावी जावून साजरा करता येत नाही हे भान ठेवून सामाजिक बांधिलकी जोपासून आज रोजी नारळी पौणिमा रक्षाबंधन निमित्त शिवसेना महिला आघाडीतर्फे ग्रामिण रुग्णालय राळेगाव येथील कर्तव्य दक्ष मुख्य वैदकिय अधिकारी डॉ. पंकज चव्हाण,श्रीकान्त लापसेटवार मुख्य टेक्नीशियन ,ब्रदर एकनाथ काळे यांना व कर्मचारी वर्गांना राखी बांधुन रक्षाबंधन हा सण साजरा केला, हा सण शिवसेना महिला आघाडीतर्फे सौ. वर्षाताई मोघे महिला आघाडी तालुकाप्रख, लता भोयर महिला आघाडी शहरप्रमुख , सौ सिमरन इमरान पठाण नगरसेविका तथा गटनेता न.प राळेगाव, सौ . मिना शंकर गायधने मा. नगरसेविका, सौ शितल संतोष कोकुलवार , सौ रिता राकेश राउळकर , सौ. कांताबाई मेश्राम , सौ . श्रृति जगदिश सरदार , सौ मंदाताई गेडाम,लिला पेन्दोर , यांनी साजरा केला, यावेळी शिवसेना तालुका प्रमुख विनोद काकडे, शहरप्रमुख राकेश राउळकर , शंकर गायधने, धनराजजी श्रीरामे, संतोष कोकुलवार नगरसेवक तथा बांधकाम सभापती न, प, महेन्द्र तुमाने राळेगाव, इमरान पठाण शहर संघटक, अमोल राउत , युवासेना तलुका प्रमुख , योगेश मलोन्डे युवासेना शहरप्रमुख मनोज वाकुलकर , दिपक येवले , सुनिल शिरसागर, सुनिल सावरकर, आदेश आडे , अंकुश गेडाम, मनोज राउत . हनुमान डाखोरे व विशेष उपस्थिती ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथील सर्व कर्मचारी तसेच तालुक्यातील सर्व परिचित भरतभाउ परचाके यांची उपस्थिती होती, शिवसेना महिला आघाडिच्या या उपक्रमाचे वैदकिय अधिकारी व जनतेकडून कौतुक करण्यात येत आहे.
