

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड
हिमायतनगर:-
भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवा निमित्त हर घर तिरंगा मोहिमेला तालुक्यात भरभरून प्रतिसाद मिळत असून हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या उपस्थितीत हिमायतनगर तालुका काँग्रेस कमिटीने दि १३ ऑगस्ट रोजी सरसम बू. येथून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव गौरव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते या पदयात्रेत आमदार साहेबांनी ७ किमी पायी प्रवास करून तालुक्यातील नागरिकांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी रॅलीस मोठ्या संख्येने उत्फुर्त प्रतिसाद दिल्याने हर घर तिरंगा मोहिमेला अधिक गती मिळाली असल्याचे दिसून आले,
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बु. येथुन हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या उपस्थितीत प्रथमतः क्रांतीसुर्य बिरसा मुंडा व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून नंतर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या गौरव पदयात्रा सुरुवात केली ह्या पदयात्रेस येथील अनेक राजकीय कार्यकर्त्यांनी भर भरून प्रतिसाद दिला व हिमायतनगर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या सरसम बु. ते हिमायतनगर या गौरव पदयात्रेत स्वतः आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी सहभाग नोंदवला व ते सहभागी झाल्याने अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला नागरिकांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन जोरदार घोषणा दिल्या व या रॅलीमध्ये वंदे मातरम्,भारत माता की जय, हर घर तिरंगा असे नारे देत तिरंगा ध्वज हातामध्ये घेऊन राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सायप्रस इंग्लिश स्कूल येथे १० मिनिटे थांबून येथील विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले व नंतर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मोहम्मदिया दारलुम येथील मौलानांनी सर्व पद यात्रिना मोफत पाणी वाटप केले व नंतर शहरातील मुख्य रस्त्याने फिरून जनजागृती करण्यात आली सदर रॅलीमध्ये काँग्रेसचे अनेक पदाधिकारी
सहभागी झाले होते हर घर तिरंगा मोहीम यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील सर्वच कार्यकर्त्यांनी चांगलीच कंबर कसल्याने ही मोहीम यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे,व हिमायतनगर पोलीस प्रशासनाच्या वतीने रो़ख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. व हिमायतनगर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक बि, डी भुसनर यांच्या व अशोक संगमवार, अविनाश कुलकर्णी , उपस्थिती होते,
यावेळी हदगाव हिमायतनगर विधानसभा पक्ष निरीक्षक संजयजी लहानकर, हदगाव तालुका अध्यक्ष आनंदराव भंडारे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, शहर अध्यक्ष संजय माने, मजर मौलाना, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश वानखेडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रफिक शेठ, माजी जिल्हा परिषद सदस्य समद खान, प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल भाई, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, सरसम नगरीचे उपसरपंच अतुल वानखेडे, प्रल्हाद पाटील टेंभुर्णीकर, जनार्दन ताडेवाड, शाम जक्कलवाड, गोविंद बंडेवार, श्री दत्त पाटील सोनारीकर, नामदेव मोकासवाड, सुनील वानखेड़े, साईनाथ शिंदे, कपील काबळे अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान, काँग्रेस महिला तालुका अध्यक्ष ज्योतीताई पार्डीकर, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष फेरोज खुरेशी, युवा कार्यकर्ते योगेश चिल्कावार, प्रशांत देवकत्ते, दशरथ सावले, मोहन ठाकरे, पंडित ढोणे, अमोल जोगदंड,शुभम जक्कलवाड, किरण माने सह आदी काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक मोठ संख्येने उपस्थित होते
