
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सव वर्षानिमित्य पंचायत समितीत गटविकास अधिकारी केशव पवार यांच्या उपस्थितीत दिं १३ ऑगष्ट २०२२ वृषारोपन करण्यात आले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्य पंचायत समिती दिं १०/ ८/२०२२, ते १२ /८/२०२२ या तीन दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर दिं १३ ऑगष्ट २०२२ ला ध्वजारोहण करून पंचायत समितीच्या परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला असून या वृक्षारोपण कार्यक्रमाला उपस्थित कक्ष अधिकारी वनलवार, विस्तार अधिकारी दीपक मस्के,रामेश्वर सुर्वे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी दिनेश वाईकर व नरेगा टीम तसेच कृषी अधिकारी बरडे,कृषी विस्तार अधिकारी राहुल वंजारी, बनकर मॅडम आदी कर्मचाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले असून या कार्यक्रम सर्व पंचायत समितीतील अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
