
प्रती /प्रवीण जोशी(ढाणकी)
जेष्ठा गौरी महालक्ष्मीच्या सणाला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्व असून हा सण पारंपारिक पद्धतीने , भाद्रपद शुक्ल पक्षातील सप्तमीला महालक्ष्मीचे आगमन होते व अष्टमीचे दिवशी अभिषेक पुजन पुरणपोळीचा महानैवेद्य व महाआरती केली जाते यावेळी महालक्ष्मीचे माथ्यावर फुलोरा बांधला जातो.दसरे दिवशी सायंकाळी महालक्ष्मी साजश्रुंगार पाहण्यासाठी भक्तजन घरोघरी भेट देऊन दर्शन घेतात,व महिलांसाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रम आयोजित केला जातो यादिवशी काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्नदानही करण्याची पध्दत आहे.
घरात प्रतिवर्षी जेष्ठा गौरी महालक्षीमी पुजन केल्यास वर्षभर घरात सुख, सम्रुध्दी,व उत्तम आरोग्य ,शांतता,मानसिक समाधान लाभते अशी भावना भाविकांमध्ये आहे.या सणाच्या निमित्ताने भाऊबंद व पाहुणे मंडळी एकत्रीत एकमेकाशी संवाद साधत या सोहळ्याचा आनंद घेत असतात. असा हा आनंदाई धार्मिक सोहळा श्रध्दायुक्त अंतःकरणाने आनंदी वातावरणात शहरासह तालुक्यात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.
