
ढाणकी – प्रतिनिधी (प्रवीण जोशी)
अवकाळी पावसातील सुसाट वाऱ्यामुळे ढाणकी बिटरगाव रस्त्यावरील बाभळीचे झाड अक्षरशहा रस्त्यावरच मोडून पडल्यामुळे प्रवाशाना सोमवारी दिवसभर अडथळयाचा सामना करावा लागला.
सोमवार हा दिवस आठवडी बाजाराचा दिवस असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरीकांची या रस्त्यावरूण मोठया प्रमाणात ये-जा सुरू असते.तसेच महामंडळाच्या बस सेवेच्या फेऱ्या या रस्त्यावर सुरू असतात.परंतू ये-जा करण्यासाठी रस्त्यावर मोडून पडलेल्या बाभळीच्या झाडापासून वाहण चालवितांना बस चालकाला रस्त्याच्या खाली बस गाडी उतरूण जोखीम पत्करावी लागत आहे.सतत पाउस सुरू असल्यामुळे गाडीचे चाक मातीमध्ये फसण्याचे अथवा घसरूण खाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दुचाकी, तिनचाकी व चार चाकी वाहन चालकांना वाहन चालवितांना दिवसभर मोठी कसरत करावी लागत आहे.रस्त्यावर मोडून पडलेले बाभळीचे झाड उचलून अथवा त्याची विल्हेवाट करूण बाजूला सारण्यासाठी कोणत्याही विभागाचा कर्मचारी अजून तरी तेथे फिरकला नाही.दिवसा वाहण चालकांना रस्त्यावर पडलेले झाड दूरूनच लक्षात येते मात्र रात्री या झाडावर दुचाकी,तिनचाकी अथवा चार चाकी वाहन पडलेल्या बाभळीच्या झाडावर जावून अपघात होण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यासाठी बाभळीचे पडलेले झाड रस्त्यावरून बाजूला सारण्याची प्रक्रीया बांधकाम विभागाने घ्यायला पाहिजे.परंतू बांधकाम विभागाचा मैलकुली दिवसभरातून एकदाही तेथे दिसून आला नाही.या उद्भभवलेल्या नैसर्गीक आपत्तीचा बळी कोणी ठरू नये एवढीच माफक अपेक्षा.
