
हल्ली खरीप हंगामातील अनेक शेतकऱ्यांचे पीक उगवलेच नाही. त्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन हे पीक फेल ठरले, यातच पिकाची उगवण क्षमता कशाप्रकारे तपासावी त्याची माहिती व प्रात्यक्षिक मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी तेजस्विनी इंगोले,शृतम मिश्रा, गौरव रंगे,समीक्षा धाये यांनी तालुक्यातील रातचांदना येथिल शेतकऱ्यांना दिली.
पेरणीपूर्वी एक आठवडा आधी बियाणांची उगवण क्षमता असलेली तपासणी केली पाहिजे. बियाणांची उगवण क्षमता तपासने आवश्यक आहे. तसेच योग्य वेळी त्याची मात्रा वाढवावी हे ठरविण्यात ही तपासणी मदतदेखील करेल जर बियान्यांची उगवण क्षमता ८० टक्के ते ९० टक्केपर्यंत असेल, तर चांगले आहे. जर बियाण्याची उगवण क्षमता ६० टक्के ते ७० टक्के पर्यंत असेल तर पेरणीच्या वेळी त्या बियाणांचे प्रमाण वाढवावे आणि उगवण क्षमता ५० % पेक्षा कमी असेल तर त्या बियाण्यांची पेरणी करू नये. अशी माहीती विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना दिली. पिक उगवण क्षमतेबद्दल माहीती असावीच असे शेतकर्यानी मत व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांनी बीज उगवण क्षमतेचे विविध प्रकार शेतकऱ्यांना समजावून सांगितले.
या कार्यक्रमास प्राचार्य डॉ.आर .ए .ठाकरे ,उपप्राचार्य मंगेश कडू, विषयतज्ञ डॉ. प्रतीक बोबडे, कार्यक्रम अधिकारी प्रा.सौरभ महानूर या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास रातचांदना येथिल शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
