
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी – प्रशांत राहुलवाड
साहित्याकडून समाजसेवेकडे या ब्रीदवाक्याला खरे ठरवत अल्पावधीतच आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांनी साहित्य क्षेत्रात वेगळा ठसा उमटवलेल्या कवी विचार मंच शेगाव या साहित्यिक समूहातर्फे समूहातील साहित्यिकांसाठी दि १७ ते १९ सप्टेंबर रोजी सहलीचे नियोजन करण्यात आले आहे.ही सहल वलसाड -दमन-सिल्वासा- दादरा नगर हवेली(गुजरात) इथे असणार आहे.अशी माहिती कवी विचार मंच शेगाव चे संस्थापक तथा समूह प्रमुख फौजि,कवी शिवशंकर चिकटे यांनी दिली आहे.
समाजात वावरताना आपल्याला अनेक कौटुंबिक,नौकरी,सामाजिक तसेच इतरही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.पण या जबाबदाऱ्या पार पाडताना थकवा ,आराम मिळावा यासाठी मात्र सध्या कुणाचे लक्षच जात नाहीये.प्रत्येक जण आपापल्या कामात एवढा व्यस्त झालाय की स्वतः साठी कामातून वेळच मिळत नाही.सदानकदा आपण तणावयुक्त वातावरणात वावरत असतो.यामुळे आपले मानसिक आरोग्य ढासळत चालले आहे.यासाठी उपाय योजना म्हणून कवी विचार मंच शेगाव तर्फे साहित्यिकांच्या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.दि १७,१८ व १९ सप्टेंबर या कालावधी मध्ये या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. यात समूहातील ६० इच्छुक साहित्यीक समाविष्ट आहेत.
या सहली दरम्यान कवी सम्मेलन ,गझल,गीत गायन,गाण्याच्या भेंड्या,उखाणे,लेडीज-जेन्ट्स खेळांच्या स्पर्धा आणि फोटो सेशन अश्याप्रकारे उपक्रम राबविले जातील.यामुळे सर्वांचा तणावमुक्त वातावरण मिळेल व सर्वांचे मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत मिळेल.तसेच या सहलीमुळे समूहातील सर्व साहित्यिकांची स्नेह संमेलन घडून येणार आहे. समूहातर्फे सर्व सदस्यांना टीशर्ट आणि टोप्या यांचे वाटपही करण्यात येणार आहे.या सहलीसाठी आयोजक म्हणून कवी आनंद ढाले (गुजरात) हे अथक परिश्रम घेत असून यासाठी कवी शिवशंकर चिकटे,कवयित्री अलका बोर्डे यांनी पुढाकार घेतला आहे.यात महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यातून साहित्यिक येणार असल्याचे कवी विचार मंच शेगाव चे संस्थापक कवी शिवशंकर चिकटे यांनी सांगितले आहे.
