
प्रती/प्रवीण जोशी
ढाणकी…
शेतकऱ्यांना जणू संकटाच्या मालिका च पार पाडाव्या लागत आहे यावर्षी प्रचंड प्रमाणात पाऊस झाला अनेक शेतातील सोयाबीनचे पीक नष्ट झाले आणि जे यातून बचावले त्यांना किडींना व रोगांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे.
या किडीचा प्रादुर्भाव सुरुवातीच्या तीस दिवसात होतो चक्रभुंगे अंडे सोयाबीनच्या झाडावर घालते आणि त्याचे रूपांतर आळी मध्ये होण्यासाठी साधारणतः 25 ते 30 दिवसाचा कालावधी लागतो ती आळी सोयाबीनच्या खोडा मधील अन्ननलिका पूर्णपणे नष्ट करते त्यामुळे उभे पीक वाळू लागते यासाठी सुरुवातीच्या तीस दिवसात दोन कीटकनाशकाच्या फवारण्या घेणे गरजेचे असते ज्या शेतकऱ्यांनी या फवारण्या घेण्याचे टाळले त्यांच्या सोयाबीन वर याचा शंभर टक्के प्रादुर्भाव आढळून आला. या नुकसानीची नोंद सरकारने घेऊन जास्तीत जास्त मदत शेतकऱ्याला देऊ करावे, व ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा नोंदविला त्या शेतकऱ्यांनी पावसामुळे नुकसान न नोंदवता किडीमुळे नुकसान होत आहे हे सुद्धा पीक विमा कंपनीच्या निदर्शनास आणून दिल्यास अधिक उत्तम होईल .
