राळेगांव तालुक्यातील ११ ग्रामपंचयात निवडणुकीचा निकाल जाहीर

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर

राळेगांव तालुक्यातील मुदत संपलेल्या ११ ग्रामपंचतीच्या निवडणुकीचा निकाल आज दिं १९ सप्टेंबर २०२२ रोज सोमवारला जाहीर झाला असून या ११ ग्रामपंचायतीपैकी १० ग्रामपंचायतीच्या निकाल जाहीर झाला तर १ ग्रामपंचायत अविरोध झाली आहे.तालुक्यात वाटखेड,सावनेर,कारेगाव,आटमुर्डी,चिखली(वि),खैरगाव (का),एकुर्ली,पळसकुंड,खेमकुंड,चोंढी, ग्रामपंचायतीच्या निवडणुका काल दिं १८ सप्टेंबर २०२२ रोज रविवारला पार पडल्या असून आज १० ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे.तर भीमसेनपूर ही ग्रामपंचयात अविरोध झाली आहे. यावर्षीची सरपंच पदाची निवडणूक ही थेट जनतेतून असल्याने सरपंच पदाच्या निवडणुकीकरिता मोठी चुरस झाली होती तेव्हा ११ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाकरिता ३४ उमेदवार रिंगणात होते तर सदस्य पदाकरिता १४२ उमेदवार रिंगणात होते. नुकत्याच लागलेल्या ग्रामपंचतीच्या निकालात वाटखेड येथील सरपंच म्हणून प्रीती गणेश गेडाम,सावनेर,अमिता प्रवीण खोब्रागडे,कारेगाव प्रेमीला महादेव सिडाम, आटमुर्डी रमेश महादेव आत्राम,चिखली(वि) चारणदास साधुजी मेश्राम,खैरगाव(का)माणिक लखमा किन्नाके, एकुर्ली कवडू नामा कुळसंगे, पळसकुंड वनिश निजाम घोसले, खेमकुंड,संगीता संजय देवतळे,चोंढी नीता निळकंठ कोवे, तर भीमसेनपूर येथे अविरोध सरपंच विमल अंबादास देवनारे हे निवडून आले.