गटबाजी च्या काळोखापल्याड गवसला काँग्रेस ला यशाचा राजमार्ग,[प्रा.वसंतराव पुरके ऍड. प्रफुलभाऊ मानकर, ही दोस्ती तुटायची नाय भूमिकेत ]

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

  

साठ वर्ष ज्या पक्षाने देशावर राज्य केले, सर्वसमावेशक विचारधारा ही ओळख निर्माण करणारा पक्ष म्हणून जनमाणसात जे स्थान काँग्रेस ने मिळविले गेल्या दशकभरात काँग्रेस च्या नेत्यांनी ते बऱ्यापैकी धुळीस मिळवले. यवतमाळ जिल्हा हा राजकीय दृष्ट्या काँग्रेस चा गढ मानला जायचा, त्याचे ही बुरुज एव्हाना ढासळू लागले आहे. राळेगाव तालुक्यात मात्र ही पडझड काही अंशी थांबली. नगर पंचायत निवडणुकी पासून काँग्रेस ला अच्छे दिन येण्याची चाहूल लागली. लगोलग सहकार खात्यातील ऍड. प्रफुलभाऊ मानकर यांच्या गळ्यात काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाची माळ पडली, आणि काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांना जणू दहा हत्तीचे बळ प्राप्त झाले. मात्र या फुगत चाललेल्या फुग्याला महाविकास आघाडी सरकार कोसळने व एकनाथ शिंदे सरकार सत्तारूढ होण्याची टाचणी लागली आणि पुन्हा एकदा काँग्रेसची वाटचाल निराशेच्या गर्तेकडे सुरु झाली.

या पार्शवभूमीवर काँग्रेस च्या भव्य बैलबंडी मोर्चाने पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतले असून राळेगाव तालुक्यातील काँग्रेस मध्ये नवचैतन्य निर्माण करण्यात बऱ्यापैकी यश येतं असल्याचे चिन्ह दिसू लागले आहे.
काँग्रेस चा परंपरागत मतदार संघ असणाऱ्या तालुक्यात भाजपा ने दशकभरात चांगलीच मुसंडी मारली. पंचायत समिती, जिल्हापरिषद सह विविध संस्थेवर भाजपा ने कमळ फुलविले. भाजपा च्या या विजयात काँग्रेस मधील गटबाजी चा वाटा मोठा होता. हे होतं असतांना देखील राळेगाव तालुक्यातील सहकार क्षेत्रावर मात्र ताबा मिळवण्याचे भाजपा चे स्वप्न पूर्णत्वास गेलें नाही.काँग्रेस ची वाताहत होतं असतांना देखील ऍड प्रफुल भाऊ मानकर यांनी सहकार क्षेत्रावर एकहाती सत्ता कायम राखली. पक्षाने याची दखल घेत जिल्हाध्यक्ष पदावर त्यांना संधी दिली. राळेगाव तालुक्यात या संधी चे सोने करण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. लगतच्या कळंब तालुक्यातील काँग्रेस वर पावसामुळे मोर्चा तील बैलबंडी कॅन्सल करण्याची नामुष्की ओढवली असली तरी राळेगाव तालुक्यात मात्र हा मोर्चा प्रचंड यशस्वी ठरला. भर पावसात काँग्रेस चे पदाधिकारी, कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असल्याचे दुर्मिळ पण आवश्यक कार्य करीत असल्याचे दिसून आले.
राळेगाव विधानसभा क्षेत्रात प्रा. वसंतराव पुरके गट, तिकडे कलमं मध्ये प्रवीणभाऊ देशमुख गट, राळेगाव मध्ये ऍड. प्रफुलभाऊ मानकर गट असे गटातटाचे राजकारण काँग्रेस ची खरी डोकेदुखी ठरली आहे. प्रत्येक बड्या नेत्याने आपले कार्यकर्ते घेऊन पक्षांतर्गत एक वेगळी चूल मांडलेली पहायला मिळते. हा इतिहास नवा नाही. हे उघड गुपित प्रत्येकाला माहिती झाले असून प्रदेशच्या नेत्यांनीही स्वीकारले आहे. यात आपसी समन्व्य निर्माण करण्याचे प्रयत्न अधून-मधून झाले पण यात यश मात्र आले नाही. त्या नंतर भाजपा चा डंका वाजायला लागला. 2014 नंतर तर सातत्याने काँग्रेस ला पराभवाचे तोंड पाहावे लागले. अनेक बड्या काँग्रेस नेत्यांचे गढ ढासळायला सुरवात झाली. तेव्हा कुठे काँग्रेस नेत्यांना उपरती झाली. जी गोष्ट विजयाच्या उन्मादाने लक्षात आली नाही ती पराभवाने काँग्रेस ला शिकवली, किमान राळेगाव तालुक्यातील काँग्रेस बाबत तरी असे म्हणता येईल.
राळेगाव नगर पंचायत, त्या नंतर झालेल्या काही ग्रामपंचायत व ग्रा. वि. का या निवडणुकीत काँग्रेस ला मतदारांनी पसंती दिल्याचे दिसलें. याच्या मुळाशी गेल्यास प्रा. वसंतराव पुरके व ऍड प्रफुलभाऊ मानकर या नेत्यांनी व त्यांच्या गटातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी गटबाजी ला मूठमाती देतं एकत्रित येतं लढा दिला हे या विजयाचे महत्वाचे कारणं ठरले. आताही प्रत्येक ठिकाणी नेते एकत्र येतं असल्याने एक ताकद पक्षाची निर्माण झाली आहे. आरक्षणाचा तिढा निर्माण झाल्याने जि. प. प. स. निवडणुका लांबनीवर गेल्या मात्र काँग्रेस ने निवडणुका जाहीर होताच जी तयारी केली ती अभूतपूर्व होती. हा टेम्पो टिकवून पक्षाने वाटचाल केल्यास गतवैभव काँग्रेस च्या पदरात येईल यात दुमत नाही. काँग्रेस ने आता या आघाडीवर थांबता कामा नये. पक्षाचे नेते खा. राहुल गांधीच्या पदयाट्रेतुन राळेगाव तालुका काँग्रेस ने काय बोध घ्यायचा हाच की थांबला तो संपला.

माइक ची कमांड पुरके सरांच्या हातीराज्याचे शालेय शिक्षण मंत्री म्हणून एक वेगळा ठसा प्रा. वसंतराव पुरके यांनी राज्याच्या राजकीय पटलावर उमटविला. आजही एक अभ्यासू व उत्कृष्ट वक्तृत्व असलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे. काँग्रेस मधील मनोमिलनानंतर होणाऱ्या रस्त्यावरील लढ्यात घोषणा देण्याची, निषेधाची जबाबदारी प्रा. वसंतराव पुरके यांनी स्वतः कडे घेतली आहे. आक्रोश मोर्चा असो की बैलबंडी मोर्चा असो माइक सरांच्या हाती असतो. अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी, प्रश्नांची उत्तम जाणं, अचूक शब्दफेक, स्पष्ट आवाज, आणि शासनाच्या धोरणावर कडाडून हल्ला हे त्यांच्या ओघवत्या बोलण्याची काही खास विशिष्ट सांगता येतील. बैलबंडी मोर्चात तर जवळ-जवळ तालुक्यातील मुख्य गावे व राळेगाव शहरात एकट्यानीच मैदान गाजविले. अनेकांना त्या मुळे चांगलाच हुरूप आल्याचे दिसलें.