पोलीस भरतीसाठी एन सी सी चा वेगळा कोटा बनवा,पोलीस भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांचे निवेदन

पोलीस भरतीमध्ये NCC च्या बोनस मार्क मुळे भरतीची तयारी करणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. एनसीसीच्या विद्यार्थ्यांना इतर कोणत्याही जनरल GENERAL, OBC, ST,SC,NT, आणी इतर कोणत्याही रिझर्वेशन कोट्यामध्ये त्यांना बोनस मार्क न देता, NCC वेगळा रिझर्वेशन 1ते 5% चा कोटा तयार करावा आणी त्यांना आरक्षण द्यावे त्यामुळे आम्हाला काही हरकत नाही.याकरिता मा.उपविभागीय अधिकारी वरोरा यांना निवेदन देण्यात आले .निवेदन देताना पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी पृथ्वीराज राजु पुरी, रितेश लोणारे, करण रुयारकार, प्रवीण राठोड, सचिन शेंद्रे, सागर जिलगीलवार, आशु उर्फ दत्ता, विशाल मिसार आणि इतर पोलीस भरती तयारी करणारे विद्यार्थी निवेदन देताना उपस्थित होते.