एकंबा येथे जि.प.प्रा.शा. शाळेची गुणवत्ता चाचणी व शालेय तपासणी…

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड

हिमायतनगर तालुक्यातील के.प्रा.शा. विरसनी येथील केंद्रप्रमुख मा.श्री रावते सर यांनी केली.त्यांनी परीपाठामध्ये सहभाग घेतला .यावेळी त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सरांनी परीपाठ , गोषवारा,शालेय पोषण आहार, गणवेश, पाठ्यपुस्तक वाटप, शिष्यवृत्ती,शालेय व्यवस्थापन समिती,माता पालक संघ गट, विद्यार्थी हजेरी,शिक्षक हजेरी, परीक्षा मुल्यमापन,अध्ययन स्तर ,सेतू चाचणी पूर्व व उत्तर चाचणीचे पेपर,आकारिक चाचणी क्र.1 पेपर, आर्थिक अभिलेखे, विद्यार्थी प्रवेश निर्गम ,शा.पो.आहार समिती, ग्रंथालय व देवघेव ,भाषा व इंग्रजी पेटी ,व इंग्रजी पेटीचा वापर दररोज व्हावा असे मत ही व्यक्त करून मोडू द्या, फुटू ध्या,फाटू ध्या पण तिन्ही पेटीचे वापर करा असे ही सांगितले. जयंती पुण्यतिथी इत्यादी रजिस्टर ची पाहणी केली व समाधान व्यक्त केले.
यानंतर वर्ग 1 ते 4 च्या मुलांचे प्रकट वाचन,श्रुतलेखन , कविता गायन,संख्यावाचन ,संख्या लेखन, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार,आकृत्याचे लेखन व वाचन, घड्याळ पाहून वेळ सांगणे इ.प्रश्नांसंबंधी विद्यार्थ्यांकडून माहिती विचारून घेतली.तद्नंतर इ.4 च्या वर्गाची चाचणी घेण्यात आली.
विद्यार्थी प्रतिसाद , शाळा परिसर स्वच्छता, वर्ग स्वच्छता , स्वच्छता गृह, साऊंड सिस्टीमवर घेतलेला परिपाठ व टि.व्ही.चा अध्यापनात होत असलेला वापर यावर रावते सर समाधानी झाले.इ चौथी तील विद्यार्थी चे जोडशब्दाचे वाचन, इंग्रजी शब्द पाठांतर ,15 पर्यंतचे पाढे पाठांतर व कविता गायन पाहून सरांनी तिचे अभिनंदन केले.
शालेय पोषण आहारचे नमुना तपासून भाजीपाला जास्त प्रमाणात वापर व्हावा आशा सूचना ही मु ,अ कोकुलवार यांनी तसेच शा, पो, आ कामगारांना दिल्या.