
चंद्रपूर – ७ वी अखिल भारतीय पोलीस ज्युडो क्लस्टर – २०२२ क्रीडा स्पर्धा इंदिरा गांधी स्टेडीयम न्यू दिल्ली येथे स्पर्धा सुरू असून यामध्ये पोलीस शिपाई प्रवीण रामटेके यांनी महाराष्ट्र पोलीस संघाचे प्रतिनिधित्व करत उत्तर प्रदेश सीआयएसएफ, राजस्थान, आयटीबीपी संघाला प्रतिउत्तर देत
महाराष्ट्र पोलीस संघाला कराटे या क्रीड़ा प्रकारत ८४ वजन गटातुन कास्यपदक पटकावून दिले. सीआयएसएफ अतिरिक्त पोलिस अधिकारी निना सिंग यांच्या हस्ते प्रवीण रामटेके यांना कास्यपदक देवून सन्मानित करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यात पोलिस दलात कार्यरत असलेले प्रवीण रामटेके याने महाराष्ट्र संघाला पहिले पदक प्राप्त करून दिले. पहिले पदक मिळाल्यामुळे प्रविण रामटेके यांचे पोलिस विभागातर्फे तसेच मित्र परिवार तर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.
