शेतकरी, शेतमजुरांसह महाविकास आघाडीचा मोर्चा
[धडकला कळंब तहसील कार्यालयावर]

सहसंपादक: रामभाऊ भोयर

आदिवासी समाजाची खाउती, शेतकरी, शेतमजूर, घरकुल लाभार्थी, बेरोजगार युवक आरोग्य शैक्षणिक, यांच्या हिताच्या गोष्टी करत शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या केंद्र व राज्य शासनाला जागे करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीने येथील बाजार समिती येथून तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या मोर्चाला प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख उपस्थित होते. त्याच बरोबर मोर्चाला माजी शिक्षणमंत्री प्राध्यापक वसंत पुरके, प्रवीण देशमुख आदिवासी सेवक किरण कुमारे निकम ताई उपस्थित होते. या कार्यक्रमात , शिवसेना यवतमाळ जिल्हा प्रमुख किशोर इंगळे, ओबीसी
विभागाचे अरविंद वाढोणकर, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे तालुकाप्रमुख तथा कार्यकर्ते तसेच विविध सहकार क्षेत्रातील मुरब्बी पदाधिकारी व तालुक्यातील शेतकरी शेतमजूर व सुशिक्षित बेरोजगार उपस्थित होते. या आंदोलन दरम्यान ग्रामिण भागातील ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात सहभाग झाल्याचे दिसून आले. दोन हजारांच्या जवळपास संख्या उपस्थित होते. यावेळी तहसिल कार्यालयात तहसीलदार यांना निवेदन दिले. आणि ताबडतोब शासनस्तरावर पाठपुरावा करण्यासाठी सांगितले. या मोर्चातील आजची उपस्थिती सत्ताधाऱ्यांची झोप उडविणारी होती या मोर्चाची पूर्ण तालुक्यातील जनतेत सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे.

शेतकरी विरोधी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे शेतकरी विविध समस्यांना तोंड देत आहे. वाढती महागाई व नौकरी भरती यामुळे सर्वसामान्य जनता व सुशिक्षित बेरोजगार डबघाईत सापडले आहे. यावर्षी झालेली अतिवृष्टीमुळे शासनाने राळेगाव मतदारसंघात ओला दुष्काळ जाहीर करुन भरीव आर्थिक मदत द्यावी, पिक विम्याची अग्रीम २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून पिक कर्ज माफी द्यावी आदी मागण्यांसंदर्भात शासनाला जागे करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने जन आक्रोश आंदोलन पुकारण्यात आले होते.


किरण कुमरे