
कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव
निवघा – पासून जवळच असलेल्या कोळी गावात प्राथमिक आरोग्य केंद्रात दि २६ सप्टे या दिवशी महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन योजने अंतर्गत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या सिबिरात जवळपासच्या खेड्यातील रुग्णांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
या महात्मा ज्योतीराव फुले आरोग्य विमा योजने अंतर्गत ९७२ उपचार आणी १३१ पाठपुरावा सेवा समाविष्ट आहेत. या योजने अंतर्गत मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले गेले होते. या शिबीरामध्ये मोफत तपासणी आणी निदान केले जाणार होते. या योजने अंतर्गत कुटुंबंांची एकत्रित वार्षिक उत्पन्न १ लक्ष किंवा त्यापेक्षा कमी आहे. अशा कुटुंबंांना दारिद्र्य रेशेखालील पिवळ्या सिधाधारक आफहार कार्ड धारक या योजनेत समावेश आहे.
या सिबिरात विशेष करून रेणुकाई क्रिटिकल केअर सेंटर अँड मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल नांदेड चे सुप्रसिद्ध डॉक्टर निलेश बास्टेवाड , डॉ. विलास मुसळे , डॉ. प्रशांत मेरगेवाड , कोळी गावचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी किशोर क्षीरसागर , कोळी गावचे सरपंच प्रा. संजीव कदम , उपसरपंच संतोष पाटील चौतमाल , तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधर पाटील चौतमाल , कृष्णा पाटील चौतमाल व गावातील व जवळपासच्या खेड्यातील मोठ्या प्रमाणात रुग्ण उपस्थित होते.
