
विदर्भवादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली चंद्रपूर जेटपुरा गेट समोर नागपूर कराराची अहिंसात्मक होळी.
स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भनिर्मिती मिशन- २०२३ आगामी लक्ष केंद्रित करीत विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी ,नक्षलवादालाआळा घालण्यासाठी ,प्रदूषण व कुपोषण संपवण्यासाठी, बेरोजगारांच्या रोजगारासाठी एकच उपाय व पर्याय म्हणजेच “स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मिती” हा उद्देश बाळगत .विदर्भ राज्य आंदोलन समिती च्या वतीने चंद्रपूर जिल्हास्तरावर ऐतिहासिक जेटपुरा गेट जवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा परिसरात महात्मा गांधींना अभिवादन व पुष्पमाला अर्पण करीत शांततेच्या व अहिंसात्मक मार्गाने विदर्भवादी घोषणा व निदर्शने करीत दिनांक 28 सप्टेंबर 2022 ला नागपूर करार दिनी नागपूर कराराची असंख्य पत्रके संयुक्तिक पणे जाळून होळी करण्यात आली . या आंदोलनात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे विदर्भवादी शेतकरी संघटनेचे नेते उत्कृष्ट वक्ते विधानसभा संवाद पट्टू माजी आमदार अँड. वामनरावजी चटप, जिल्हा अध्यक्ष किशोर दहेकर ,सामाजिक कार्यकर्ते जनमंच सदस्य अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे संघाचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र तिराणिक , जिल्हा महासचिव अंकुश वाघमारे ,ईश्वर सहारे, राजेश माकोडे, अविनाश ऊके शहराध्यक्ष युवा आघाडी, अनिल दिकोंडवार शहर प्रमुख चंद्रपूर ,सुदाम राठोड अध्यक्ष चंद्रपूर विभाग युवा आघाडी ,कपिल इदे अध्यक्ष युवा आघाडी पूर्व विदर्भ, गोपी मित्रा चंद्रपूर शहर समन्वयक ,रमेश राजूरकर कोर कमिटी सदस्य, हिराचंद बोरकुटे कोर कमिटी सदस्य, मितीन भागवत महासचिव युवा आघाडी विदर्भ प्रदेश, अॅड. फरहाद बेग, मारोती बोथले श्री संगमवार ,ई. खिरटकर, ए .रामटेके संतोष यादव, नथमल सोनी , मुन्ना खोब्रागडे , पी एड खडके, पुंडलिक गोडे, अशोक खांदेकर, योगेश मुळेकर अँड. चैताली कटलावार अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा महिला आघाडी ,सारिका उराडे अध्यक्ष चंद्रपूर शहर महिला आघाडी आधी प्रमुख विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विविध जिल्हा तालुका शहर स्तरावर नेतृत्व करीत आंदोलनातील असंख्य कार्यकर्त्यासहित सहभाग दर्शवला.
केंद्र सरकारने विदर्भाचे स्वतंत्र राज्य तात्काळ निर्माण करावे. . विजेची दरवाढ राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावी. अन्नधान्यावरील जीएसटी तात्काळ रद्द करावी. पूर, अतिवृष्टी व ढगफुटीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्याने हेक्टरी ७५हजार रुपये तात्काळ मदत जाहीर करावी.
आधी इतर रास्तमागण्या घेऊन विदर्भ राज्य आंदोलन समितीने आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचे पहिले पाऊल म्हणजेच नागपूर करारदिनी विदर्भाच्या विविध पातळीवर जिल्हा तालुका शहर ग्रामीण ठिकाणी नागपूर कराराची होळी आज करण्यात आली.आंदोलनाचे दुसरे पाऊल महात्मा गांधी जयंती दिनी २ऑक्टोबरला महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर आत्मकलेश आंदोलन विदर्भ स्तरावर प्रत्येक जिल्हा व तालुका पातळीवर करण्यात येईल. आंदोलनाचे तिसरे पाऊल दिनांक ३ ऑक्टोबर २०२२ ला मा.पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री यांना जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी ,तहसीलदार कार्यालय मार्फत निवेदन सादर करण्यात येईल. ‘वेगळे विदर्भ राज्य झालेच पाहिजे” हा जय घोष करीत .सदर पुढील आंदोलनात विदर्भातून हजारोंच्या संख्येने सामील व्हा! असे आव्हान याप्रसंगी विदर्भ राज्य आंदोलन समिती चंद्रपूर च्या वतीने करण्यात आले.
