
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
आज दिनांक ११/१०/२२ रोजी आम आदमी पार्टी राळेगाव तर्फे मा.तहसिलदार राळेगाव यांना निवेदन देण्यात आले सबब निवेदनात राज्य शासनाने २०पेक्षा पट संख्या कमी असलेल्या जि.प.शाळा पुर्ण बंद करण्याची अधि सुचना दिली होती त्यामुळे आज संपूर्ण राज्यभर आम आदमी पार्टी कडुन जिल्हा भर अशा निर्णयाविरुद्ध निवेदनाची मोहिम राबविण्यात आली त्याला यवतमाळ जिल्ह्यात चांगला प्रतिसाद देण्यात येवुन अशा जि.प. शाळांना पुर्वी प्रमानेच सुरू ठेवण्यात याव्या अशी मागणी राळेगाव आम आदमी पार्टी कडुन करण्यात आली या प्रसंगी तालुका अध्यक्ष आशिष भोयर सह संयोजक गौतम तागडे सर युवा आघाडी संयोजक प्रमोद सुखदेव वनकर जळका शाखा प्रमुख सुभाष येलेकार सचिव पुरुषोत्तम बोरकर सुखदेव वनकर गजानन सराटे व इतर सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते .
