बोगस ट्रान्सफॉर्मर बसविणाऱ्या ठेकेदारावर तात्काळ कारवाई करा मनसेचे उपविभागीय राळेगाव व सहाय्यक अभियंता महावितरण राळेगाव यांना निवेदन

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील खैरी, पिंपरी सावित्री, दहेगाव, आष्टोना, देवधरी, सावनेर, आणि तालुक्यातील इतर गावातील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा तत्काळ सुरळीत करून नवीन ट्रान्सफॉर्मर तत्काळ बसविण्यात यावे तसेच बोगस ट्रान्सफॉर्मर बसविणाऱ्या ठेकेदारावर तात्काळ कारवाई करावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी साहेब राळेगाव व सहाय्यक अभियंता महावितरण राळेगाव यांना निवेदन देऊन चक्का जाम आंदोलनाचा ईशारा देण्यात आला.

यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट, तालुकाध्यक्ष राहुल गोबाडे, मनविसे तालुकाध्यक्ष शैलेश आडे, राळेगाव शहर अध्यक्ष प्रतीक खिरटकर, तालुका संघटक नरेंद्र खापणे, भारत निंबुळकर, बंडू भारसाखरे, विठ्ठल शेंडे, करन नेहारे, निलेश पिंपरे, अमोल गेडाम,अक्षय आडे, स्वप्नील नेहारे, प्रवीण आडे, गौरव चवरडोल, मंगेश गारघाटे, अनिल मेश्राम, शेतकरी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.