जिल्ह्याचे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी

गृह विभाग महाराष्ट्र राज्य तर्फे आज निर्गमित झालेल्या आदेशानुसार राज्यातील एकूण 24 आय पी एस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.त्यात चंद्रपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक साळवे यांच्या जागी रवींद्र परदेशी यांची बदली करण्यात आली आहे. माजी पोलीस अधीक्षक साळवे यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित होती.मागील दोन वर्षात घडलेल्या गुन्ह्यांमध्ये बऱ्याच गुन्ह्यात आरोपी शोधण्यात त्यांना यश आले.
रवींद्र परदेशी हे मुंबई येथे उप आयुक्त राज्य गुप्तवार्ता म्हणून कार्यरत होते.रवींद्र परदेशी हे काही वर्षाआधी वरोरा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली.