
कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवक यांनी चुकीच्या पद्धतीने सर्वे करून शासनाला खोटी माहिती पुरवून शासनाची तसेच शेतकऱ्यांची एक प्रकारे दिशाभूल केली असल्याचे येथील समस्त शेतकरी बांधवांनी सांगितले आहे.
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील खैरगाव (जवादे) येथिल समस्त शेतकरी बांधवांनी उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार राळेगाव यांच्या कडे संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी खोटी माहिती पुरवून शेतकऱ्यांची व शासनाची दिशाभूल केली असल्याची तक्रार दाखल केली आहे. सविस्तर वृत्त असे दरवर्षी पेक्षा या वर्षी मोठ्या प्रमाणात राळेगाव तालुक्यातील खैरगाव जवादे येथिल अतिवृष्टी झाली आहे. यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राळेगाव तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने नुकसान भरपाई म्हणून राज्य शासनाने हेक्टरी १३६०० रुपयांची मदत जाहीर केली आहे परंतु कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक यांनी चुकीच्या पद्धतीने सर्वे करून शेतकऱ्यांची व शासनाची दिशाभूल केली व शेतकऱ्यांना खऱ्या अनुदानापासून वंचित ठेवले आहे. सदर खैरगाव जवादे येथिल समस्त शेतकरी बांधवांना अतिवृष्टीचे वाढीव अनुदान देण्यात यावे तसेच शेतकऱ्यांची एक प्रकारे दिशाभूल केली आहे म्हणून आमची सर्वांची विनंती आहे की कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवक तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येवून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा. सदर आमच्या योग्य मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही लोकशाही मार्गाने उपोषणाला बसणार असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. सदर तक्रार दाखल करतेवेळी शेतकरी सचिन मुनेश्वर,नानाबाई अलोने,पवन हिवरकर,शबुबाई हिवरकर,अंजुबाई हिवरकर, राजेंद्र वाळके, गजेंद्र वाळके, प्रशांत मुनेश्वर,कलावती जवादे, सिताराम हिवरकर, अशोक पानवटे, महादेव मेश्राम,राजु नागोसे,नाना नागोसे,प्रकाश अलोने, रामचंद्र वसाके, मारोती मडावी, विठ्ठलराव तोडासे, वासुदेव तोडासे, सुरेश मेश्राम, दिलिप नागोसे, नानाजी मेश्राम,कीशोर जवादे,प्रविण मुनेश्वर, गुलाब वड्डे, तुळशीदास कांबळे, पंढरीनाथ गाऊत्रे, श्रीरंग हिवरकर, भास्कर वड्डे,शालीक सिडाम, उपस्थित होते.
