वरणा येथे फूड स्प्रे प्रात्यक्षिक

सहसंपादक : रामभाऊ भोयर

दिनांक 29 ऑगस्ट गुरुवार रोजी स्पेक्ट्रम फाउंडेशन द्यारा गाव वरणा येथे शेतकरी धनराज शेंडे व अमोल नैताम यांच्या शेतात शेतकऱ्यांना फूड स्प्रे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. सध्याच्या परिस्थितीत होत असलेल्या अती जास्त कीडनाशकांच्या फवारणीमुळे जे मित्र कीड नष्ट होत चालली आहे त्यांच्या संख्येत वाढ होण्यासाठी व त्यांना पोषक वातावरण मिळण्यासाठी केलेला एक प्रयत्न होय. एकात्मिक किड नियंत्रण पद्धती, कपाशी पिकावरील मित्र व शत्रू किडीची ओळख.फवारणी करतानी वयक्तिक सुरक्षात्मक साधनाचा वापर व कीडनाशकांची त्रिवता ओळखून डब्यावरील हिरवा,निळा,पिवळा रंग पाहून या क्रमा नुसार फवारणी करण्याचा निर्णय घेणे या बाबत सविस्थर माहिती पियु व्यवस्थापक नरेश बाजरे यांनी दिली.फूड स्प्रे तयार करण्यासाठी लागणारी साधन सामग्री व त्याची पक्रिया याबाबत माहिती तेथील प्रक्षेत्र अधिकारी हितेश भोयर यांनी दिली.कार्यक्रमाला प्रक्षेत्र अधिकारी लक्ष्मण येडस्कार,संदीप जगताप,वैभव इजपाडे, वैभवी वाकडे,अंकुश नांन्हे तसेच गावातील शेतकरी महिला,पुरुष व मजूर वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.