ढाणकी परिसरात थंडी वाढली. थंडीची चाहूल लागताच शेकोट्या पेटल्या.

ढाणकी प्रतिनिधी-प्रवीण जोशी.


ढाणकी परिसरात थंडीची चाहूल लागत असून या पासून वाचण्यासाठी शहरात चौका चौकात शेकोट्या पेटल्याचे चित्र दिसत आहे.
हवामान विभागाच्या नोंदीप्रमाणे असे लक्षात येते की, जास्त व कडाक्याची थंडी पडण्याचा, पावसाळ्यातील कमी जास्त पाऊस पडण्याची तीळ मात्र संबंध नाही. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सिर सिर त्या गारव्याने एकदम कडाक्याच्या थंडीत रूपांतर झाल्यामुळे धानकी परिसरात रात्री ग्रामीण भागात जागोजागी शेकोट्या पेटल्या. ऑक्टोबर च्या 13 तारखेपासून परतीच्या पावसाने थैमान घालून हाती आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान केले. त्यामुळे शेतकऱ्याच्या अंगात अगोदरच हूडहुडी भरली होती. सोयाबीन पिकाची काढणी आणि गहू हरभरा या रब्बी पिकाची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. अशातच थंडीची चाहूल लागताच गरम व उबदार कपड्यांनी बाजारपेठ सजली आहे. काही नागरिकांनी कपाट बंद असलेली जुनी गरम कपडे अंगावर चढून गुलाबी थंडीचा बचाव करत आहेत. ग्रामीण भागात तर चौका चौकावर शेकोट्या पेटवून अंगावर गरम शाल चादर घोंगडी रग इत्यादी पांगोरणे रक्त गोठवणाऱ्या थंडीला पळवून लावत आहेत.                                       लहान मुले स्वेटर, गरम मुलांचे पाय मोजे, हातात ग्लोज घालून गुलाबी थंडी  ची मोज लुटत आहेत. यावर्षी थंडी ही नागरिकाची धडकी भरवणारी असल्याने अनेकांच्या मनात थंडी बद्दल उत्सव उत्सुकता ही दाटून येत आहे. सहा नोव्हेंबर पासून दिवसा गारठा पडणार असल्याच्या कुजबुजीला पेव फुटले असून, दिवसा आणि रात्रीच्या तापमानात 11 ते 17 अंश सेल्सिअस एवढा फरक असेल त्यामुळे रात्रीपासून सकाळपर्यंत थंडी जाणवत र राहील पण  दुपारचे तापमान मात्र 30 ते 35 डिग्री सेल्सिअस  राहील. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी धुके पडत आहे.