अतिवृष्टीची मदत अत्यल्प, शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली,फेर तपासणी करून वाढीव मदत दया, शेतकऱ्यांची होत आहे मागणी



ढाणकी:-प्रवीण जोशी


उमरखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असुन शेतकऱ्यांना राज्य सरकारने जाहीर केलेली आर्थिक महसुल प्रशासनामार्फत बँकेत जमा झाली.मात्र अत्यल्प मदत मिळाल्याने शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची प्रतिक्रिया वेक्त होतं आहे. या बाबत फेर सर्वे करून वाढीव मदत देण्याची मागणी बऱ्याच शेतकऱ्यांच्या च्या वतीने करण्यात येत आहे.
याद्या लागून बँक मध्ये रक्कम जमा झाली. १३,६०० रू हेक्टरी मदतीच्या नावाने असलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात मात्र हेक्टरी ५ हजार, काही शेतकऱ्यांच्या 8हजार कोण्या शेतकऱ्यांच्या,9हजार अशा पद्धतीने रक्कम जमा होत आहे.
ढाणकी परिसरातील शेतकऱ्यांच्या ऐन दिवाळीच्या तोंडावर तोंडाला पाणे पुसले गेली आहे त्यामुळे तत्काळ उमरखेड तालुक्याला विशेष पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची सरसकट आर्थिक मदत मिळवुन द्यावी अशी ढाणकी व आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांची मागणी आहे.