
ढाणकी प्रतिनिधी -प्रवीण जोशी
“एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ,” या सहकाराच्या तत्व प्रमाणे सहकार क्षेत्रामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या बुलढाणा अर्बन कॉपरेटिव बँकेने आपल्या कार्यतत्परतेचा परिचय नुकताच दिला आणि मृत बँकेच्या सभासदाच्या वारसास तब्बल चार लाख 81 हजार रुपये विम्याचे पैसे मिळऊन दिले.
बुलढाणा अर्बन कॉपरेटिव बँक शाखा ढाणकी येथील शाखेमध्ये अमोल दिलीप माने राहणार चातारी यांनी चार लाख 81 हजार डिपॉझिट केले होते मात्र त्यांचा अपघातात मृत्यू झाल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर आले . या घटनेची माहिती मिळताच ढाणकी शाखेचे व्यवस्थापक सचिन पांडे यांनी मयत सभासदाच्या घरी जाऊन विभागीय व्यवस्थापक सौ मुग्धा देशपांडे यांच्या मार्गदर्शनानुसार कुटुंबाचे सांत्वन केले आणि मयत अमोल माने यांच्या कुटुंबीयांकडून आवश्यक ती कागदपत्रे घेऊन विमा प्रस्ताव मंजुरीसाठी मुख्यालयाकडे सादर केला. सदर प्रस्ताव मंजूर होऊन मयताचे वारस रेणुकाबाई दिलीप माने यांना चार लाख 81 हजार रुपयांचा चेक आज ढाणकी येथील शाखेत देण्यात आला. यावेळी बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप बोस, शाखा व्यवस्थापक सचिन पांडे, नंदकिशोर चौधरी, प्रमोद शिनकरे, संध्या घुगरे, पुरुषोत्तम बंडीवार, दिगंबर माने, विनोद चौधरी, कंचन ठाकूर, ठेवीदार व सभासद उपस्थित होते.
