अपघाता साठी कारणीभूत ठरतं आहे कालबाह्य वाहने
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
कालबाह्य म्हणजे आयुमर्यादा संपलेली असंख्य वाहने राळेगांव शहरात व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुसाट वेगाने धावत असून स्वतः सोबत इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत.
या मध्ये मोटरसायकल ची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, चारचाकी प्रवासी व मालवाहू वाहने व प्रवासी ऑटो,तीनचाकी मालवाहू वाहने
देखील इतक्या खस्ता हालतीत आहे की बघून चं धडकी भरतेय.
विशिष्ट काळा साठी कोणत्याही वाहनांची आयुमर्यादा आखून दिलेली आहे. पण मात्र एक लाख रुपयांची नविन मोटरसायकल घेणे प्रत्येकाला शक्य च नाही,याचाच गैरफायदा जुनी वाहन विक्रेते घेऊन वीस ते पंचवीस हजार रुपयांना कालबाह्य मोटरसायकल ग्राहकांच्या माथी धूधा करुन मारत आहे. असाच थोडा फार हिशोब चारचाकी प्रवासी व मालवाहू वाहनांच्या बाबतीत ही आहे.
दहा ते पंधरा लाख रुपयांचा वर चारचाकी वाहनांचा दर आहे.
तीन ते पाच लाख रुपयां पर्यंत ही वाहने उपलब्ध करुन देण्यात येते.
खाजगी वित्तीय संस्था आपली दुकानदारी चालविण्या साठी कागदपत्रे योग्य करुन नवतरुण सुशिक्षित बेरोजगारांना नानाविध आमिष दाखवून ही वाहने विकतात.
सुरुवातीला व्यवसाय व्यवस्थित नंतर मात्र वाहन देखभाल दुरुस्ती वाढतच जाते.आणि आहे तशा स्थितीत ही वाहने प्रवासी व मालवाहू वाहतूक करतात.
भरगच्च प्रवासी व क्षमते पेक्षा जास्त माल भरुन ही वाहने भरधाव वेगाने रहदारी च्या रस्त्यावरुन धावत असतात.
अशा बहुतांश वाहन धारकां जवळ वाहन चालविण्याचा परवाना नाही,वाहनांचा वीमा व फिटनेस प्रमाणपत्रा सह इतर अत्यावश्यक असलेली कागदपत्रे नाही. या सर्व बाबी अपघाता नंतर उजेडात येतात तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते.
अशा अक्षम्य दुर्लक्ष व चुकांमध्ये वीमा सुरक्षा कवच मिळत नाही. न्यायालयाच्या तारखा मात्र नित्यनेमाने कराव्या च लागतात.
राळेगांव शहरात व तालुक्यातील बहुतांश गावात अशी दुचाकी, प्रवासी ऑटो,तीनचाकी मालवाहू व चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणावर आहे.
जीवितहानी साठी या वाहनांचा मोठा धोका आहे या साठी परिवहन विभाग व पोलिस प्रशासनाने या वाहनांची नित्यनेमाने तपासणी केली तर अनेक अशी वाहने भंगारात किंवा पोलिस स्टेशन ला जमा होऊ शकतात.
