रानमेवा म्हणून परिचित असलेल्या सीताफळाची बाजारपेठेत आगमन


प्रतिनिधी, प्रवीण जोशी
ढाणकी


सर्वसामान्यांना परवडेल व अतिशय सहजपणे उपलब्ध होणारे फळ म्हणून सीताफळ परिचित आहे. व ग्रामीण भागातील रानमेवा म्हणून या फळाला संबोधले जाते. खाण्यास अत्यंत मधुर व रुचकर शरीराला अत्यंत लाभदायी म्हणून परिचित आहे व याच फळाचे ढाणकी शहरात जुन्या बसस्थानक परिसरात व बाजारातील ठिकठिकाणी सीताफळाची दुकान लागल्याचे दिसत आहे .
साधारणपणे विजयादशमी संपतात सीताफळाची बाजारात आवक सुरू होते. सध्या विविध ठिकाणी विक्रेते फळाची विक्री करत असताना दिसून येत आहेत यावर्षी सीताफळाचे दर स्थिर असल्यामुळे सर्वसामान्यांना परवडेल अशा दरामध्ये सीताफळे उपलब्ध होत असल्याकारणाने ग्राहकाला त्याचा आस्वाद घेणे सोपे झाले आहे. व हंगामी आणि शरीराला लाभदायक असल्याने सिताफळाला विशेष मागणी आहे. यावर्षी पर्जन्यवृष्टी परिपूर्ण झाल्यामुळे मध्यमवर्गीयांचा ग्रामीण सुकामेवा म्हणून ओळख असलेल्या या बहुरंगी फळाची आवक गेल्या पंधरा दिवसापासून बाजारात होत आहे तसेच सीताफळाचा हा हंगाम जून ते जानेवारी इतक्यात तीन बहर असतात जून ते ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर शेवटचा बहार हा जानेवारी आणि फेब्रुवारी चा असतो सध्याचा भर हा जून ते ऑक्टोबर चा बहर बाजारात आला आहे. सिताफळ लागवड उपयुक्त ठरते व सिताफळाला जास्त महाग असलेल्या फवारणीची गरज सुद्धा नसते त्यामुळे कमी लागवड जास्त उत्पादन मिळणारे पीक म्हणून याकडे बघितले जाते तसेच यामुळे अनेकांना तात्पुरता रोजगार सुद्धा उपलब्ध होत आहे.
चौकट… प्रत्येक ऋतूत येणारे फळ जरूर खाल्ले पाहिजे शरीराला लाभदायक असते. तसेच सीताफळात भरपूर कॅल्शियम, प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन, असल्याकारणाने सीताफळ शरीरास लाभदायी आहे पित्तशमक बलवर्धक व वाता वर अत्यंत उपयुक्त मानले जाते तसेच ऍसिडिटीचा त्रास सुद्धा सिताफळाने कमी होण्यास मदत होते म्हणून प्रत्येक ऋतूत येणारे फळ खाले पाहिजे.
रंगनाथ नारायण कोडगीरवार
(ज्येष्ठ नागरिक)