ग्रामपंचायत कीन्ही जवादे येथे “बालकसभा “

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

कीन्ही जवादे १४/११/२०२२
ग्रामपंचायत कीन्ही जवादे चे वतीने जिल्हा परीषद शाळा कीन्ही जवादे येथे “बालकसभा” घेण्यात आली.
पं जवाहरलाल नेहरू, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान यांच्या जयंतीनिमित्त,बालकसभा घेऊन गावातील भावी पिढीला ग्रामपंचायत, व शासकीय कामकाजाची माहिती देण्यात आली.यावेळी सरपंच सुधीर जवादे यांनी “कीन्ही जवादे शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मीळवुन शिष्यवृत्ती स पात्र ठरेल त्याला रु १००००/(₹दहा हजार)रोख बक्षीस व संबंधित शिक्षकास ₹५०००/बक्षीस देण्याची घोषणा केली.तसेच जिल्हा परीषद शाळेतुन सातव्या वर्गात प्रथम येणाऱ्यास “ऐक दिवसांचा सरपंच”चा सन्मान देण्यात येईल.
यावेळी उपसरपंच रमेश तलांडे सदस्य प्रसाद निकुरे,शाळा समितीचे अध्यक्ष राजु भाऊ मोहुर्ले , शिक्षक व्रुंद उपस्थित होते.