बिटरगांव (बु) आरोग्य सुविधा सलाईनवर ?

.बिटरगांव प्रतिनिधी : प्रवीण जोशी.

परिणामी दोन वर्षात डेंग्यू व चिकुनगुनिया साथीने नागरिक त्रासलेले आहेत. बिटरगांव बु परिसरात गणेशवाडी या खेड्या मध्ये एका एका घरी दोघे दोघे पाॅजिटीव आले आहेत यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

रस्ते गटारी यांची कामे थांबली आहेत. स्वच्छता ठेकेदारच्या मक्तेदारीमुळे वेळेत गटारी साफ होत नाहीत. अतिवृष्टीने काही गटारी पडल्या आहेत. गणेशवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आहेत. वेळेत उपचार सुविधा नाही. खासगी उपचार सर्वसामान्य नागरिकांना परवडत नाही. त्यामुळे काहींना जीव गमवावा लागला आहे.बिटरगांव बु ग्रामपंचायत स्वच्छता ठेकेदारावर लाखोच्या घरात खर्च करते. यामध्ये फक्त मलिदाच गोळा होतो. रस्त्यावरच कचरा असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डेंग्यूची साथ पसरते. ती आटोक्यात येऊ शकत नाही. फक्त कागद काळा करून बिले काढली जातात. यावर कोणाचेही नियंत्रण नाही. ग्रामपंचायत मधी सदस्य नाहीत. त्यामुळे शासकीय अधिकारी कर्मचारी यांचा मनमानी सूर असतो. त्यामुळे डेंग्यू साथीला आटोक्यात आणणे आरोग्य विभागाला आव्हान ठरले आहे

गावातील अस्वच्छ गटारी वेळेत साफ होत नाही. त्यामुळे डेंग्यू सारख्या साथीने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गणेशवाडी परिसरातील जनते मधे भितिच वातावर आहे याची दखल आरोग्य खाते कधी घेणार असा प्रश्न उपस्थित करूनही दखल घेतली जात नाही.