बिबट्याच्या हल्यात गंभीर जखमी झालेल्या शेतकरर्याला वनमंत्री सुधीरभाऊ मूनगंटीवार यांच्याकडून तात्काळ आर्थिक मदत

वन अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश

पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम

पोंभूर्णा वनपरीक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या देवाडा बिटातील बोर्डा झुल्लुरवार गावालगत दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटणा दिनांक ४ डिसेंबरला सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली श्री. काशीनाथ बुरांडे वय ५० वर्ष असे गंभीर जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे याबाबत वनविभागाला माहीती देण्यात आली असून जखमी काशीनाथ बुरांडे यांना तात्काळ उपचारार्थ ग्रामीण रुग्नालय पोंभूर्णा येथे दाखल करण्यात आले आहे एका महिन्यातच हि दूसरी घटना असल्याने परीसरात भीतीचे वातावरण पसरले असून या चौताळलेल्या बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करण्याची मागणी सामाजीक कार्यकर्ते राकेश गव्हारे व गावातील नागरीकांनी वनविभागाकडे केली आहे घटनेची माहिती राज्याचे वनमंत्री तथा चंदपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीरभाऊ मूनगंटीवार यांना मिळताच वन अधिकारी यांना चौकशीचे आदेश देत जखमी शेतकर्याला तात्काळ आर्थिक मदत दिली भाजपा पदाधिकारी ग्रामीण रुग्नालय पोंभूर्णा येथे जाऊन रुग्णांची विचारपूस केली यावेळेस भाजपा महिला जिल्हाध्यक्षा कु. अल्काताई , नगरसेवक अजीत मंगळगीरीवार , ऋषी कोटरंगे, जनार्धन सातपूते उपस्थित होते