ढाणकी येथे भव्य भजन स्पर्धा संपन्न,नऊ मंडळांचा सहभाग

ढाणकी/ प्रतिनिधी :प्रवीण जोशी.

दरवर्षीप्रमाणे दत्त जयंतीच्या औचित्याने ढाणकी येथे, श्री दत्त मंदिर टेंभेश्वर नगर येथे समस्त ढाणकीवासीयांतर्फे यात्रेचं आयोजन करण्यात येतं. या यात्रेमध्ये अनेक प्रकारच्या स्पर्धा होतात. या स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांना एक व्यासपीठ दिल्या जातं. त्याचाच एक भाग संगीत भजन स्पर्धा होय. या भजन स्पर्धेत विदर्भातील वेगवेगळ्या गावचे अनेक संघ दाखल होत असतात. कोरोनामुळे गेले दोन ते तीन वर्षे ठप्प झालेली यात्रा यावर्षी सुरळीत सुरू झाली. आणि अनेक स्पर्धांचे आयोजनामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या भव्य भजन स्पर्धेसाठी तब्बल नऊ संघांनी सहभाग घेतला. यात उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या संघांचे अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पाच व सहा असे क्रमांक, पुसद येथील तबला अलंकार ओमकुमार गवई यांच्या हस्ते परीक्षण करण्यात आले. यात प्रथम क्रमांक ऋषी प्रसन्न भजनी मंडळ हिंगणी १११११ रु., द्वितीय विनायक स्वर संच नागेशवाडी ५१११ रु., तृतीय निजधाम भजनी मंडळ मुडाणा ३५११रु., चतुर्थ स्वरांकुर भजनी मंडळ उमरखेड २५११रु., पाचवे मार्तंड भजनी मंडळ टेंभुरदरा पुसद २१११रु., तर सहावे बक्षीस जय श्रीराम भजनी मंडळ विडूळ ११११रु. यांना देण्यात आले. या संपुर्ण स्पर्धेचं आयोजन समस्त ढाणकीवासीयांतर्फे करण्यात आले होते .