मुख्य बाजारपेठेत अग्नितांडव,चार दुकाने जळून खाक


ढाणकी प्रतीनीधी:प्रवीण जोशी


उमरखेड ढाणकी मुख्य रस्तालगत असलेल्या बाजार पेठेतील चार दुकानांची शॉटसर्कीटमुळे आग लागुन राखरांगोळी झाली. दिनंाक 25 ला रात्री साडे दहा वाजता अचानक आगीचे डोंब उसळल्याचे काही नागरीकांनी पाहिले असता अग्नीने रूद्र रूप धारण केले होते. त्यात चार दुकानांतील साहित्य व दोन मोटरसायकल जळुन खाक झाले.

मागील दोन वर्षात कोरोना काळात सर्व दुकाने बंद होती आणि आत्ताच कसेतरी दुकाने व्यवस्थित चालत असताना अशाप्रकारे आग लागू नुकसान झाल्यामुळे व्यावसायिक मात्र हवालदिलं झाले यात अंदाजे तीस ते पस्तीस लाख रूपये नुकसान झाल्याचे कळते. मुख्य बाजारपेठ असलेल्या चार दुकानांची आग लागल्याचे कळताच उमरखेड येथिल अग्नीशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. एका तासात अग्नीशामक दल पोहचताच नागरीक व दलाच्या जवानांच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्यात आली. त्यामुळे बाजारपेठेतील मोठी जिवीतहाणी व वित्तहाणी टळली.
ढाणकी उमरखेड रस्तावर असलेल्या चापके वेल्डींग शॉप, शेख सत्तार फर्नीचर, सदानंद भोयर अॅटोमोबाईल व वासमवार बल्ली मर्चट, या दुकानातील लकडी फर्नीचर, वेल्डींग वर्कशॉप मधील साहित्यसह दोन मोटरसायकल , वासमवार यांचे लाकडी खांब, अश्या एकुण साहित्यासह,अंदाजे पस्तीस लाख रूपयांचे नुकसान झाले. आग लागल्याचे कळताच नागरीकांनी मोठया प्रमाणात घटणास्थळी धाव घेतली. घटनास्थळी बिटरगाव पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. प्राथमिक अंदाजानुसार शॉट सर्कीटमुळे आग लागल्याचे बोलले जात आहे.