
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
राळेगाव नगरपंचायतीच्या अस्थायी कर्मचारी बंधू भगिनींनी ,वालमिक,मेहतर सफाई कामगार आपल्या मागण्या घेऊन दिनांक 22/12/2022 रोजी पासून तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणाला बसले असून आज आठ ते नऊ दिवस होऊन सुद्धा त्यांच्या मागण्याची नगरपंचायतीच्या प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसून आज दिनांक 31/12/2022 रोजी आदिवासी सेवक किरण कुमरे यांनी उपोषण मंडपाला भेट दिली.आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.आणि त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी काॅंग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस देवानंद पवार यांच्या हस्ते काॅंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे यांच्या मागण्या निवेदन पाठवणार असल्याचे सांगून त्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आदिवासी सेवक किरण कुमरे यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.
