
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील पळसकुंड, उमरविहीर गट ग्रामपंचायत सरपंच वणीस घोसले यांच्याकडून आदिवासी कुटुंबातील वृद्ध महिला, पुरुष यांना गरम कपडे व ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे राळेगाव तालुक्यातील आदिवासी भाग म्हणून ओळख असलेल्या डोंगरी भागामध्ये असलेलं पळस कुंड हे गाव आहे या गावांमध्ये बऱ्यापैकी आदिवासी लोक वास्तव्य करीत आहे त्यांच्या गरिबीची जाण करून सतत चार ते पाच दिवसापासून कडाक्याची थंडी लक्षात घेता पळसकुंड, उमरविहीर येथिल कर्तव्यदक्ष सरपंच श्री वणीस घोसले यांनी एक हात मदतीचा म्हणून स्वखर्चाने पळस कुंड गावातील आदिवासी गरजूंना गरम कपडे व ब्लॅंकेटचे वाटप केले आहे वाटप करते वेळेस सरपंच वनीश भोसले, उपसरपंच सुभाष शिंदे ग्रामपंचायत सदस्य नानाजी सिडाम, व ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावातील नागरिक उपस्थित होते खऱ्या गरजूंना सह खर्चातून ब्लॅंकेट व कपडे वाटप केल्याने सर्वत्र त्यांचे वाहवा केली जात आहे.
