तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत गुजरी शाळेची दमदार कामगिरी ( कबड्डी व रिले करीता संघ जिल्हास्तरावर दाखल )

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

    

झाडगाव येथील लखाजी महाराज विद्यालयाच्या प्रांगणावर 4 ते 6 जाने. दरम्यान तालुकास्तरीय खेळ व क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत जि . प. उ. प्रा. शाळा गुजरी च्या मुलांनी विविध क्रीडा प्रकारात दमदार कामगिरी करून गुजरी गावाचा लौकिक वाढविला. कबड्डी क गटाचे तालुकास्तरीय विजेतेपद, रिले स्पर्धेत तालुक्यातून प्रथम क्रमांक तथा यशाला गवसणी घातली.
राळेगाव केंद्राअंतर्गत आस्टा येथे या आधी केंद्र स्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या. यात कबड्डी व लंगडी प्रक्रम क , रिले, कैरम, टेनिक्वाइट, रनिंग आदी स्पर्धेत गुजरी जि. प. उ. प्रा. शाळा संघाने विजय प्राप्त केला. जळका येथे ही यशाची परंपरा कायम राहिली.झाडगाव येथे तालुका स्तरीय स्पर्धेत देखील नाव कमवून जिल्हास्तरावर जाण्याचा मार्ग प्रशस्थ झाला.टेनिक्वाइट मध्ये उपविजेते पद गुजरी शाळेला मिळाले.
दि. 9 जाने. रोजी शाळेत परिपाठाच्या दरम्यान विजेत्या विध्यार्थ्याच्या अभिनंदनाचा कार्यक्रम शालेय स्थरावर घेण्यात आला. विद्यार्थ्यांना मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला. शिक्षिका अनिता गुगूळकर, व्ही. एम. भेंडे, तेजस्वी भगत यांनी परिश्रम घेतले. मुख्याध्यापक एम. डी. काळे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.