धार्मीक कार्यात नेहमी अग्रणी राहून गावांमध्ये भक्तीमय मार्गाचा प्रसार आणि प्रचार व्हावा म्हणून दरवर्षी अखंड हरिणाम सप्ताह आयोजन करण्यात येत असते.यावर्षी सुध्दा धार्मीक सलोखा राखण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून डाॅ.लक्ष्मीकांत रावते यांच्या मार्गदर्शनार्थ गावातील अनेक वारकरी संप्रदायातील मंडळाने या कार्यक्रमामध्ये उत्स्फुर्तपणे हिरहिरीने सहभाग नोंदविला आहे. भावीक भक्तासाठी पर्वणी व कीर्तनाची परंपरा असलेल्या या भक्ती सागर रुपी कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक इंदिरा चौक येथे करण्यात आले असून त्यामध्ये नामवंत किर्तनकाराचा प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे.जसे की व्यसनमुक्ती,ग्रामस्वच्छता अभियान ,शेतकरी आत्महत्या ,आणि स्त्रि भु्रणहत्या तसेच अंधश्रद्धा व बुवाबाजी या सारख्या व समाजासाठी हाणीकारक असलेल्या जुण्या रूढी व परंपरेवर किर्तनकार प्रबोधन करणार आहेत.दिनांक १४ जानेवारी ते २१ जानेवारी पर्यंत होवु घातलेल्या या कार्यक्रमात किर्तनकार ह.भ.प.श्री पांडुरंग महाराज बेलमंडळकर,ह.भ.प.श्री.नारायण महाराज मार्लेगावकर,ह.भ.प.श्री.अशोक महाराज तळणीकर,ह.भ.प श्री.दादाराव महाराज दिग्रसकर,ह.भ.प.श्री.सुदर्शन महाराज पंडीतकर, ह.भ.प.डाॅ.श्री.दत्तात्रेय महाराज वळसंगवाडीकर यासह ह.भ.प.श्री.श्रीकांत महाराज पुणे,यांचे काल्याचे किर्तन होणार आहेत.या धार्मीक कार्यक्रमाचा ढाणकी परीसरातील नागरीकांनी लाभ घेण्यासाठी मोठयासंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक श्री.विठ्ठल रूख्माईवारकरी मंडळ तथा समस्थ ढाणकी वासीयांनी केले आहे …………….. सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम १)अखंड हरिनाम सप्ताहाच्यानिमीत्ताने या कालावधीत सकाळी ४ ते ६ काकडा भजण, २) सकाळी ७ ते १० – ज्ञानेश्वरी पारायण ३) सकाळी १० ते ११ – गाथा भजण ४) दुपारी १ ते ४ – रामायण कथा ५) सायंकाळी ५ ते ६ – हरीपाठ ६) रात्री ८ ते १० – हरिकिर्तण