

तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्या अंर्तगत येत असलेल्या झाडगाव येते वंदनीय श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५४ व्या पावन पुण्यतिथी उत्सवा निमित्त स्वर्गीय सौ चंदाताई बबनराव राडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य मोफत दंत शिबीराचे आयोजन दिनाक १३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता श्री संत तुकडोजी महाराज मंदिर येते करण्यात आले असता या शिबीरामध्ये सांवगी मेघे येथील दंत चिकित्सक डॉ यांचे मार्गदर्शन खाली परीसरातील गरीब व गरजु ३०० दंत रुग्णावर उपचार करून ९० दंत रूग्णानां मोफत कृत्रिम दात बसविण्यात आले व वंशीक दात नसलेल्या ६० रुग्णानां सांवगी मेघे येथे शरद पवार दंत महाविद्यालयात २० जानेवारी रोजी नेऊन संपूर्ण दात बसविण्यात येणार आहे या दंत शिबीराचे उदघाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तसेच स्व चंदाताई राडे यांच्या फोटोचे पुजन करून शिबीराला सुरुवात करण्यात आली होती या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी पंचायत समिती सभापती अशोकराव केवटे तर प्रमुख पाहुणे डॉ ज्ञानेश्वरजी मुडे आजीवन प्रचारक गुरूदेव सेवामंडळ मोझरी संरपच बाबाराव किन्नाके तंटामुक्ती समीती अध्यक्ष वासुदेव तिजारे उपसरपंच रोशन कोल्हे ग्रामपंचायत सदस्य रूपेश रेंघे हरीदास कुबडे गुरूदेव प्रचारक उपस्थित होते त्यावेळेस डॉ मुडे साहेब व अशोकराव केवटे यांनी आपले विचार मांडले तसेच प्रसिद्ध दंत चिकित्सक डॉ साठे मँडम तसेच डॉ धांमदे यांनी रूग्णांना उपचार व मार्गदर्शन करुन दंत महाविद्यालय सांवगी मेघे येथील मोफत उपचारासाठी आव्हान करण्यात आले तसेच मान्यवर मंडळीनी आपले विचार मांडले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन राडे यांनी केले तर आभार उमेश केवटे यांनी मानले या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रकाश सोरते यांनी केले तर दंत शिबीरा करीता प्रितम हेगडे सांवगी मेघे बळवंत काळे संजय गंधेवार गणेश खडसकार दिलीपराव केवटे सतिश झोटींग हेंमत चौधरी प्रमोद आंबटकर ओम खडसकार प्रविण विरूळकर हरीभाऊ भोयर नंदु तागडे दिनेश शेंडे सुरेश ब्राह्मणवाडे रामचंद्र धोटे संतोष त्रिपदवार अक्षय रोहणकार राजु तिजारे यांनी सहकार्य केले.
