
प्रतिनिधी प्रवीण जोशी.
ढाणकी
मानवी देह मिळून माणसे पापात्मक कर्म करतात त्यामुळे त्यांना परमानंद मिळत नाही. निष्काम कर्माने परमात्म्याची प्राप्ती होते. हे मानवी
जीवाचे प्रथम प्रयोजन होय.
असे प्रतिपादन श्रीकांतजी महाराज यांनी अखंड हरिनाम सप्ताहाच्या शेवटचे पुष्पगोवताना सांगितले.
ढाणकी शहरात १४ जानेवारीपासून अखंड हरिनाम सप्ताह चालू होता व दिनाक २१तारखेला सप्ताहाची सांगता होती. या निमित्ताने काल्याच्या कीर्तनावेळी श्रीकांतजी महाराज बोलू लागले महाराज पुढे बोलताना म्हणाले भक्तामध्ये चार प्रकारचे लोक असतात त्यात पामर, विषयी, अर्थार्थी, व ज्ञानी हे प्रकार ज्यांना देव नको आहे तो पामर आहे देव आहे पण नको म्हणतो तो विषय आहे पण देवावर श्रद्धा ठेवून भक्ती करतो तो ज्ञानप्रेमी आहे. चार भक्ता पैकी परमात्मा हा ज्ञानप्रेमी भक्ताकडेच जाऊन न सांगता कामे करतो. यावेळी महाराजांनी अनेक दृष्टांत देऊन मानव जीवनाची भूमिका काय हे सांगितले तसेच हल्लीचा भौतिक सुखामध्ये माणूस रममान होत आहे. पण परमेश्वर भक्ती शिवाय मुळीच पर्याय नाही. अलीकडच्या काळात प्रत्येक व्यक्ती एका चिंतेत आहे. पैसा असो की संपत्ती असो की ज्ञान प्रत्येक जण एका विचार प्रवाहात अडकला आहे. त्यामुळे आत्मशांती कुठेही भेटत नाही आत्मशांतीचा शोध अध्यात्माच्याच मार्गाने लागू शकतो. त्यामुळे अध्यात्मा शिवाय उपाय नाही.
तसेच भूतलावरील सर्वच जीवसृष्टीत परमेश्वराच्या अंश आहे जळी, स्थळी, काष्टी पाशानी सदा सर्वदा परमेश्वराच्या लीलेवर संपूर्ण जगाचा भार चालतो. आजही विज्ञान कितीही पुढे गेले असले तरी निसर्गापुढे ते हतबलच आहे. हे सर्वांनीच मान्य केले आणि बघितले सुद्धा माऊलीने सातशे वर्षांपूर्वी “भुता परस्परे जडो मैत्र जीवांचे” ही व्याख्या मांडली यामागे माऊलींचे वैचारिक मोठेपणा दिसते. देवाला प्राप्त करून घेण्यासाठी नामसंकीर्तन हे साधन अतिशय साधे सोपे देखील आहे या नामस्मरणाच्या कर्मामुळे मनुष्याची जन्म जन्मांतरीची पापे जळून नष्ट होतात. व शेवटी मानव दिगंतराशी जातो परमार्थ करण्यासाठी किंवा तो प्राप्त करण्यासाठी या जागी कोणालाही कसलेच उपासनेची गरज लागत नाही. की घरदार सोडून वनात जाण्याची गरज उद्भवत नाही वाचेने फक्त नामस ्मरल्याने नारायण स्वतःहून आपल्या घरी चालत येतो नाम घेण्यासाठी तर काही करावे लागत असेल तर ते फक्त शांत चित्ताने स्थिर होऊन आवडीने त्या अक्षय शक्तीला आळवावे व त्या नामाचा जयघोष करावा तसेच परमेश्वर प्राप्तीसाठी नामाशिवाय किंवा त्याखेरीज या जन्मात या ऐवजी दुसरे कोणते साधन नाही परंतु सुज्ञ आहे तोच भाग्यवंत मार्गाचा उपयोग करतो आणि मन तृत्प होत नाही तो पर्यंत भक्तीचा आस्वाद घेतो.
