बिटरगाव (बु ) येथे वरली मटका जुगार अड्यावर उमरखेड उपविभागीय पोलिस पथकांची धाड, ( उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाची धडक कारवाई)

प्रतिनिधी:प्रवीण जोशी
ढाणकी


बिटरगाव (बु )येथे गेल्या मागील काही दिवसापासून लपून-छपून, ऑनलाइन मोबाईलवर, व काही ठिकाणी दुकाने सुरू असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड यांना मिळताच उमरखेड पोलीस विभागीय पथकाने बिटरगाव बु, येथे सुरू असलेल्या वरली मटका जुगार अड्ड्यावर धाड मारून 2810 रु चा मुद्देमाल जप्त करून दोघांवर गुन्हे दाखल करून धडक कारवाई पूर्ण केली आहे,1), शंकर संभा मासाळ,2), अमोल भीमराव गायकवाड रा, बिटरगाव बु, यांचेवर कलम 12 अ नुसार मुंबई जुगार कायदा हे गुन्हे दाखल केले आहे, उमरखेड पोलीस पथकांच्या धडक कार्यवाही मुळे जुगार माफीया यांचे धाबे दनानले असून जुगार माफियांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे, यापुढील तपास बिटरगाव बु, ठाणेदार प्रताप भोस साहेब हे करीत आहे,,,,,